*घावनळेत ३ कोटी ५४ लाख आणि नेरूर येथे २ कोटी ३९ लाखाच्या रस्त्यांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ*
*मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत घावनळे रामेश्वर मंदिर ते खुटवळवाडी रस्त्यासाठी ३ कोटी ५४ लाख; नेरूर वाघोसेवाडी रस्त्यासाठी २ कोटी ३९ लाख मंजूर*
आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत घावनळे रामेश्वर मंदिर ते खुटवळवाडी रस्त्यासाठी ३ कोटी ५४ लाख रु. मंजूर केले आहेत. या कामाचा शुभारंभ रविवारी आ. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर नेरूर वाघोसेवाडी रस्ता ग्रा. मा. ३५६ खडीकरण डांबरीकरण करण्यासाठी २ कोटी ३९ लाख रु. मंजूर करण्यात आले आहेत या कामाचा देखील शुभारंभ आ. वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार वैभव नाईक यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करून हे रस्ते मंजूर करून घेतले आहेत. नादुरुस्त असलेले रस्ते आता सुस्थितीत करण्यात येणार आहेत. त्याबद्दल ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले.
यावेळी घावनळे येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, माजी जि. प. सदस्य राजू कविटकर, माजी जि प सदस्य रमाकांत ताम्हाणेकर, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, विभाग प्रमुख रामभाऊ धुरी, विभाग संघटक प्रभाकर वारंग, युवा नेतृत्व माजी उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य दिनेश वारंग, ऍड सुधीर राऊळ, सरपंच सौ. आरती वारंग, उपसरपंच योगेश घाडीगावकर, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल पालव, शाखा प्रमुख संतोष नागवेकर, जयराम सुद्रिक, महादेव कोरगावकर, डॉ बिले, ग्रा.पं. सदस्य रिया नागवेकर, योगेश पारकर, पंढरी पारकर, युवासेना पदाधिकारी, स्वप्नील शिंदे, रुपेश धारगळकर, भिसे, प्रवीण कदम, हेमंत पालव, रामचंद्र कोकरे, योगेश सावंत, आनंद परब, सचिन कोरगावकर, महेश ढवण, संदीप पारकर, पांडुरंग तोरसकर, यांसह आजी, माजी ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, ग्रामस्थ महिला उपस्थित होते.
नेरुर येथे विभाग प्रमुख शेखर गावडे,उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, सरपंच भक्ती घाडी, उपसरपंच दत्ता म्हाडदळकर, युवासेना उपतालुका प्रमुख विनय गावडे, ग्रा. पं. सदस्य संतोष कुडाळकर, प्रवीण नेरूरकर, प्रभाकर गावडे, समीर नाईक,मंजुनाथ फडके, माया शुंगारे,महादेव गावडे, विजय लाड,प्रभाकर शुंगारे, प्रसाद गावडे,उमेश परब, सुरेश परब,अमोल शुंगारे,दिपश्री नेरूरकर,मयुरी नाईक,भूषण गावडे आदी उपस्थित होते.