You are currently viewing आंगणे कुटुंबीयांतर्फे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांचा सत्कार

आंगणे कुटुंबीयांतर्फे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांचा सत्कार

जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आंगणेवाडी जत्रोत्सवात उत्कृष्ट वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने आनंद आंगणे यांच्या हस्ते जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. आंगणेवाडी जत्रेत भक्त गणाना इमर्जन्सी कॉन्टिजन्सी युनिट म्हणजेच सेफ हाउस ची निर्मिती करण्यात आली होती.

त्यामध्ये तातडीची आरोग्य सेवा तातडीच्या हार्ट अटॅक, शस्त्रक्रिया, दमा ,अपस्मार, इत्यादी सेवा अतीमहनिय व सामान्य भक्त गण, रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली होती.

डॉ. श्रीपाद पाटील यांनी तज्ञ डॉ. गिरीश चौगुले, डॉ. कुमारी अंजूना, डॉ. अंबापूरकर, डॉ. घुरये व जिल्हा वैद्यकिय महाविद्यालय व जील्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय पेंडुर कट्टा व मालवण येथील कर्मचारी नर्स, कक्ष सेवक, वाहन चालक, स्वच्छ्ता सेवक, व इतर आरोग्य कर्मचारी यांनी सेवा दिली.

यासाठी डॉ. सुबोध इंगळे निवासी वैद्यकीय अधिकारी व वैधकीय अधिक्षक डॉ. संजय पोळ, ग्रामीण रुग्णालय पेंडूर कट्टा व मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध,सुयोग्य आरोग्य व्यवस्थापन करून कामकाज करण्यात आले. जिल्हा आरोग्य विभाग व तालुका आरोग्य विभाग,ग्राम पंचायत बिळवस व पंचायत समिती,तहसील कार्यालय मालवण यांचे चांगले सहकार्य लाभले असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा