You are currently viewing दुर्गाच्या डोंगरावरील ऐतिहासिक चौकोनी विहिरीने घेतला मोकळा श्वास

दुर्गाच्या डोंगरावरील ऐतिहासिक चौकोनी विहिरीने घेतला मोकळा श्वास

*▪️दुर्गाच्या डोंगरावरील ऐतिहासिक चौकोनी विहिरीने घेतला मोकळा श्वास*

*चाफेड ग्रामस्थ व दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्यावतीने घेण्यात आली स्वच्छता मोहीम*

रविवार दिनांक ३ मार्च २०२४ रोजी देवगड तालुक्यातील चाफेड येथील दुर्गाच्या डोंगरावर असलेल्या ऐतिहासिक चौकोनी विहिरीची चाफेड ग्रामस्थ व दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता मोहीम आखाण्यात आली.
काही दिवसांपूर्वीच ऐतिहासिक दुर्गाचा डोंगराच्या संवर्धनासाठी चाफेड ग्रामस्थ व दुर्ग मावळा प्रतिष्ठानमार्फत अभ्यास मोहीम आयोजित करण्यात आलेली होती. त्यावेळी टप्याटप्प्याने दुर्गाच्या डोंगरावरील वास्तूंच्या संवर्धनाचे काम हाथी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचाच पहिला टप्पा म्हणून येथील ४० फूट लांबी ४० फूट रुंदी व ४० फूट खोली असलेल्या विहिरीची स्वच्छता करण्याचे ठरविण्यात आले. अनेक वर्षे झाडाझुडपांनी अदृश्य झालेल्या या विहिरीने संवर्धनानंतर मोकळा श्वास घेतला.
या मोहिमेला चाफेड ग्रामपंचायत सरपंच किरण मेस्त्री, उपसरपंच महेश राणे, माजी सरपंच आकाश राणे, विजय परब, सचिन मोंडकर, माजी सरपंच संतोष साळसकर, माजी उपसरपंच दीपक राणे, मंगेश तळवडेकर, स्वप्नील साळसकर, नागेश दुखंडे, अविनाश सावंत, विलास घाडी, प्रदीप घाडी, सत्यवान साटम, बाबू घाडी, महेश परब,दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे गणेश नाईक, रोहन राऊळ, शिवाजी परब, योगेश येरम, प्रसाद पेंडूरकर, गार्गी नाईक, हेमलता जाधव, यतीन सावंत, मंदार नारकर तसेच शालेय विद्यार्थी असे एकूण ३६ जण उपस्थित होते.
आजच्या या मोहिमेसाठी नवीन चैन कटरसाठी उत्कर्षां वेंगुर्लेकर, गजश्री बापू मेस्त्री, महेश मुरलीधर धुरी, राजेंद्रप्रसाद गाड, शंकर भुजबळ, लता कांबळे, उमेश हारोलीकर, जयेंद्र चव्हाण, मनीषा सरकटे,चेतन बोडेकर, योगेश येरम, शंकर मनोहर कदम, नरेश कदम, हेमलता जाधव, हृदयनाथ गावडे, जान्हवी जनार्दन पावसकर यांनी सहकार्य केले. तसेच उपस्थितांना नाश्ता व जेवणाची सोय सरपंच किरण मेस्त्री यांनी केली. दात्यांचे तसेच मोहिमेस उपस्थितांचे दुर्ग मावळा परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा