You are currently viewing मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित स्पर्धेला उदंड प्रतिसाद

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित स्पर्धेला उदंड प्रतिसाद

*मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित स्पर्धेला उदंड प्रतिसाद*

*चिंतामणी कलामंच, मुंबईच्या उपक्रमात ४०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

चिंतामणी कलामंच, मुंबई संस्थेने २६ आणि २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी शालेय मुलांसाठी हस्ताक्षर स्पर्धा आणि निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. चिंतामणी कलामंच, मुंबई ही गरीब मुलांसाठी सन २०१७ पासून कार्यरत असणारी संस्था आहे. मुलांमधील सुप्तगुणांना कलेला प्रोत्साहन देण्यावर तसेच त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास कसा होईल यावर जास्त भर दिला जातो. संस्थेमार्फत वर्षभरात अनेक उपक्रम, स्पर्धा राज्यपातळीवर राबवल्या जातात. महाराष्ट्रातील विविध विभागांतील मुलांना व्यासपीठ मिळावे, प्रतिभावंत मुले घडावी या उद्देशाने या स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात भरवल्या जातात.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त २६ आणि २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी चिंतामणी कलामंच, मुंबई ने आयोजित केलेल्या “शालांत हस्ताक्षर आणि निबंध स्पर्धेला” पहिल्याच प्रयत्नात उदंड प्रतिसाद मिळाला. चिंतामणी कलामंचचे अध्यक्ष प्रथमेश कल्पना दिपक पिंगळे आणि सचिव पूजा अविता अनंत मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

सदर स्पर्धांमध्ये ४०७ मुलांनी सहभाग घेऊन मराठी भाषा दिवस अतिशय अभ्यासपूर्ण लेखन करून आणि उत्साहात साजरा केला. सदर स्पर्धेसाठी प्रशासकीय अधिकारी, शिक्षण निरीक्षक किसन पावडे सर, प्रतीक्षानगर म.न.पा. उ. प्रा. शाळा क्र. १ – मुख्याध्यापिका सौ. वाजे मॅडम, एल. के. वागजी केंब्रिज शाळा माटुंगा-मुख्याध्यापिका सपना यादव मॅडम, प्रभादेवी म.न.पा. माध्यमिक शाळा – मुख्याध्यापक अरविंद खाडे सर, मुख्याध्यापिका पूजा पाटील मॅडम, पूजा पवार (शिक्षिका), पद्मजा राऊळ (शिक्षिका) तसेच शाळेचे मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग, स्पर्धेत सहभागी विद्यार्थी आणि पालक वर्ग यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

*चिंतामणी कलामंच, मुंबई आयोजित निबंध आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धा २०२४ च्या विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे :-*

*प्रतीक्षा नगर मनपा शाळा क्र १ सायन (इ. ६ वी ते ८ वी), निबंध स्पर्धा :-* प्रथम क्रमांक – वृषाली जितेंद्र पवार, द्वितीय – काजल रामगोपाल यादव, तृतीय – भूमी महेंद्र सावंत, उत्तेजनार्थ – निहारिका किसन वाघ, निल निलेश पाटणकर *सुंदर हस्ताक्षर सर्धा :-* प्रथम क्रमांक – वृषाली जितेंद्र पवार, द्वितीय – दिपिका दिलीप जाधव, तृतीय – निल निलेश पाटणकर, उत्तेजनार्थ – श्रेया रविंद्र कोदारे, रूपेश विनोद जगताप

*एल. के. वागजी केंब्रिज शाळा, माटुंगा, निबंध स्पर्धा (इ.१) :-* प्रथम – महेक मारू, द्वितीय – आलिया शेख, तृतीय – विहान मस्के *सुंदर हस्ताक्षर स्पर्धा (इ.१) :-* प्रथम – देवांष वाघडीया, द्वितीय – आरुष मीना, तृतीय – हिमांश शिंदे *निबंध लेखन स्पर्धा (इ.२) :-* प्रथम – अर्णव वळंजू, द्वितीय – आराध्य वासकर, तृतीय – झियान मोमीन *सुंदर हस्ताक्षर स्पर्धा (इ.२) :-* प्रथम – नाव्या गेडिया, द्वितीय – शाईनी गौतम, तृतीय – दीर्घा कोकम *निबंध लेखन स्पर्धा (इ.३) :-* प्रथम – प्रक्षुज्ञा सावंत, द्वितीय – पार्थ गुरव, तृतीय – सनवी साखरे *सुंदर हस्ताक्षर स्पर्धा (इ.३) :-* प्रथम – सान्वी पेवेकर, द्वितीय – इरा पटवा, तृतीय – मलिष्का कोणार

*प्रभादेवी माध्यमिक शाळा, निबंध लेखन स्पर्धा (इ. ५ वी ते ७ वी लहान गट)* :- प्रथम – दिक्षा गुरव, द्वितीय – गणेश साळुंखे, तृतीय – देवयानी शिर्के, उत्तेजनार्थ – स्वराज्य धनवडे, सुरज वरेकर *(८ वी ते ९ वी मोठा गट)* :- प्रथम – अंतरा वेदपाठक, द्वितीय (विभागून) – श्रावणी आईर, ऋतुजा कदम, तृतीय – श्रेयस माईल, उत्तेजनार्थ – विनायक धुमाळे *सुंदर हस्ताक्षर स्पर्धा (इ. ५ वी ते ७ वी लहान गट)* :- प्रथम (विभागून) – नेहा शिंदकर, करुणेश धवाळी. द्वितीय – विशाखा चौधरी, तृतीय – अदिती सकपाळ, उत्तेजनार्थ – विघ्नेश पवार, दिक्षा गुरव *(८ वी ते ९ वी मोठा गट)* :- प्रथम (विभागून) – श्रृती मेडि, सानिका कविटकर, द्वितीय – समीर मोरे, तृतीय – गायत्री सकपाळ, उत्तेजनार्थ – श्रावणी शिर्के

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा