*शतक नावीन्यपूर्ण उपक्रमाचे पुस्तक प्रकाशन सोहळा ९मार्चला पुण्यात होणार संपन्न
बांदा
महाराष्ट्रातील गुणवंत १०४ शिक्षकांनी आपल्या शाळेत राबविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे शतक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुणे येथे ९फेब्रुवारी रोजी पुणे येथे पार मान्यवरांच्या उपस्थितीत पडणार आहे यावेळी या पुस्तकात उपक्रम समाविष्ट असलेल्या शिक्षकांना राज्यस्तरीय गुणवंत पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे .
गेल्या सात वर्षांपासून नवी दिशा,नवे उपक्रम समूह सातत्याने सुरू असून महाराष्ट्रातील शिक्षकांना उपक्रम दिशा देण्याचे उत्कृष्ट कार्य करीत आहे.शिक्षक, विद्यार्थी, शाळा यांना या समूहाचा फायदा होत आहे.समूहाच्या माध्यमातून,समूह सदस्यांच्या सहभागातून, देणगीदार
यांनी दिलेल्या मदतीने दरवर्षी नवनवीन सामाजिक, शैक्षणिक उपक्रम आयोजित केले जातात.
यावर्षी महाराष्ट्रातील १०४ उपक्रमशील शिक्षकांना एकत्रित
करून त्यांनी प्रत्यक्ष वर्गात राबविलेल्या उपक्रमांचे “शतक नावीन्यपूर्ण उपक्रमाचे” पुस्तक
तसेच त्यांनी केलेल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची समूहातर्फे दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार दिनांक ९ मार्च २०२४ रोजी राजीव गांधी ईलर्निंग स्कूल सहकारनगर पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. संपादक मंडळाच्या वतीने सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून भव्यदिव्य सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती संपादक तथा समूह संयोजक देवराव चव्हाण यांनी दिलेली आहे. या सोहळ्याच्या नियोजनाकरिता प्रकल्प प्रमुख आयुब शेख,बळीराम जाधव, विजया महाडिक , शीतल मदने, प्रवीण पोटे, गणेश कामथे, संगीता म्हस्के, श्रीकांत देवकर, सोपान बंदावणे, हेमलता चव्हाण, जयश्री जायभाये, मनिषा बोर्डे, ज्योत्स्ना पास्ते, संगीता बागुल आदी सर्व संपादक निर्मिती मंडळ दिनरात्र कष्ट घेताना दिसत आहे. या पुस्तकात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बांदा नं१केंद्रशाळेचे शिक्षक श्री जे.डी.पाटील यांच्या शाळेत राबविण्यात येत असलेल्या मान्यवर आपल्या भेटीला तसेच दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव नं.१शाळेतील स्वाती पाटील यांच्या शाळेत राबविण्यात येत असलेल्या वेगवान मी हा उपक्रम समाविष्ट आहे.
या प्रकाशन सोहळा प्रसंगी विजया महाडिक यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक साहित्य स्टॉलचे प्रदर्शन, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे ‘शिक्षकांसाठी सानेगुरुजी’ या विषयावर व्याख्यान, शिक्षणविषयक विचार मंथनही होणार असल्याचे संपादकांनी सूचित केले आहे.
*संवाद मीडिया*
*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*
*💎एस.पी.बोअरवेल💎*
*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*
💁♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*
*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*
*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*
*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*
*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*
*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*