You are currently viewing रात्रीच्या भिंतीवर

रात्रीच्या भिंतीवर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम सहाक्षरी काव्यरचना*

रात्रीच्या भिंतीवर

रात्रीच्या भिंतीला
काळोखाचा रंग
सावळ्या मेघांचे
दिसती तरंग….

रात्रीची भिंतही
असते सुंदर
डोळ्यातील नीज
दूर क्षणभर….

चांदण टिकल्या
वस्त्रावर छान
पदरावरती
चंद्राची कमान….

अवचित काळ्या
भिंतीवर शब्द
चिरतो आवाज
रान ते निस्तब्ध….

काळोखाची भिंत
हुंदके ऐकते
करणार काय
नशीब रडते…..

स्वप्न भलेबुरे
भिंतीवर दिसे
भविष्य उद्याचे
असेल हो कसे……

काळ्या भिंतीवर
नवीन कहाणी
भिंत उजळता
गोष्ट होते जुनी……।।

〰️〰️०〰️〰️०〰️〰️
अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा