नऊ वर्षांचे वय तसेही खेळण्याचे असते़ पण इतक्या लहान वयातही काही मुले आर्थिक कमाई करण्यास सुरु करतात. आता असाच एक नऊ वर्षाचा मुलगा या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा युट्यूबर आहे, असे सांगितले तर, त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. रेयान काजी या मुलाने वयाच्या सहाव्या वर्षापासून अशा प्रकारे पैसा कमवायला सुरुवात केली आहे. आणि या वर्षी त्यानं थोडं-थोडकं नाही तर तब्बल २०० कोटी रुपये कमावले आहेत.
फोर्ब्सने अशा लोकांची यादी प्रसिध्द केली आहे ज्यांनी युट्यूबच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई केली आहे. यामध्ये ३० मिलियन डॉलर म्हणजे २२० कोटी रुपयांची कमाई करुन रेयान काजी प्रथम क्रमांकावर आहे. रेयान युट्यूबवर आपले व्हिडिओ अपलोड करतो आणि त्या माध्यमातून करोडो रुपये कमावतो. गेल्या काही वर्षापासून रेयान आपले व्हिडिओ युट्यूबवर टाकतोय. त्याच्या या व्हिडिओंना युट्यूबवर प्रचंड प्रतिसाद मिळतो, त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो.
गेल्या वर्षी १८० कोटींची कमाई
रेयान काजीने गेल्या वर्षी म्हणजे २०१९ साली युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करुन जवळपास २६ मिलियन डॉलर म्हणजे १८० कोटी रुपये कमावले होते.
*” वर्षाचा असताना पहिला व्हिडिओ”*
रेयान टेक्सास मध्ये राहतोय. त्याने २०१५ साली केवळ तीन वर्षाचा असताना पहिला व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला होता. रेयान आता स्टोअर बिझनेसमधूनही आर्थिक कमाई करतोय. त्याने वॉलमार्टशी एक डील केली आहे. त्यामुळे त्याला आपले स्वत:चे उत्पादन विक्री करता येते.