मुंबई :
नवोदित मराठी कवींना आपल्या कवितानंसाठी प्लॅटफॉर्म मिळावा, मराठी भाषा, साहित्य याची गोडी लागावी या साठी मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला रोहिणी पब्लिकेशन मुंबई, यांच्या माध्यमातून मराठी ओपन माईक शो हा कार्यक्रम प्रबोधन प्रयोग घर कुर्ला मुंबई येथे संपन्न झाला या वेळी वीस कविनी आपला सहभाग घेऊन आपल्या कविता सादर केल्या.
कार्यक्रमाची सुरवात नरेश सोनवणे, प्रतिक्षा तिटकारे यांनी आजचे लेखक, कवी, हे पडद्या मागे का राहतात. त्यांनी ही समोर आलं पाहिजे. याचे सुंदर विश्लेषण करून सांगितलं.
या कार्यक्रमात कवी. सुहास चव्हाण, कवी. डॉ. सुमेध वैद्य, प्रा. नीतू मॅडम, कवी. स्वप्नील कांबळे, कवी. मधुराणी साळुंखे, कवी. आनंद कांबळे, कवी. प्रज्ञा सोनपसारे, कवी. जितेंद्र घाणेकर, कवी. प्रशांत महागडे, कवी. रोशन राठोड, कवी. स्वाती शिरसाठ, कवी. रिचा बोरसे, कवी. सचिन जाधव, कवी. कुणाल मगर, कवी. अक्षता गोसावी, कवी. संतोष यशवंते, कवी. नरेश सोनवणे, कवी. प्रतिक्षा तिटकारे, कवी. विकास कदम, या कविनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमामध्ये विविध विषयावरील कविता कविनी सादर केल्या त्या मध्ये शेतकरी, बेरोजगारी, दैववादी, प्रेम कविता,निसर्ग, वास्तववादी कविता या सारख्या मुद्याना हात घालून कविनी बाहरदार कविता सादर केल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी रोहिणी प्रकाशनाच्या प्रकाशिका रोहिणी माया रामू वाघमारे यांनी आपला प्रवास मांडला, साहित्य निर्मिती, वाचन संस्कृती, यावर त्यांनी भाष्या करून उपस्तित कवींना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी. नरेश सोनवणे, कवी. प्रतिक्षा तिटकारे यांनी केल.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास कदम आणि रोहिणी पब्लिकेश च्या टीम ने विशेष मेहनत घेतली. शेवटी केक कापून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.