आज दिनांक २०डिसेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्ग स्वच्छता मोहिम मराठा शिक्षक संघटन सिंधुदुर्ग च्या वतीने राबविण्यात आली.
संघटनच्या आठ ही तालुक्यातून मावळे सकाळी ठिक ०९:००वाजता किल्ले सिंधुदुर्ग येथे पोहचले.
बहुसंख्येने जिल्हाभरातून आलेल्या तमाम मावळ्यांनी छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग किल्यावरील सर्व मंदिरे, विहिरी व संपूर्ण परिसराची स्वच्छता केली.प्लॅस्टीक ,बाटल्या,कचरा व गवत उचलून संपूर्ण किल्ला परिसर चकचकीत केला.
मावळ्यांच्या तुकड्यांनी आपापला परिसर स्वच्छ करताना जय भवानी जय शिवाजी,हर हर महादेव,मी मराठा संघटीत मराठा,एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला.आलेले पर्यटक ही मावळ्यांचा सेवाभाव पाहून आनंदी झाले व सेवा कार्याला सलाम करुन आपण ही गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेबाबतीत जागृक राहू असे सांगितले.
दरम्यान वायरी भूतनाथ ग्रा.पं.तीचे ही उत्तम सहकार्य लाभले.
स्वच्छते मोहिमेचा श्री गणेशा किल्ले सिंधुदुर्ग वरुन उत्साहात पार पडल्याचा आनंद प्रत्येक मावळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
पुढील संघटन कार्याविषयी नियोजन विषयक सभा घेण्यात आली व उपस्थितांचे आभार मानून सहभोजनानंतर “जय भवानी जय शिवाजी” च्या घोषणेने व शिवगर्जनेने मोहिमेची सांगता झाली.