You are currently viewing दोडामार्ग तालुकाअंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

दोडामार्ग तालुकाअंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

दोडामार्ग तालुकाअंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग

 दोडामार्ग तालुका अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील मानधनी अंगणवाडी मदतनीस पदासाठी संबंधित ग्रामपंचायत महसूल गावातील इच्छूक व पात्र महिला उमेदवारांकडून दि. 6 मार्चपर्यंत एकात्मिक बाल विकास सेवायोजना प्रकल्प कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी तारका साटम यांनी केले आहे.

            दोडामार्ग तालुक्यातील ग्राम पंचायत आणि महसूली गावाची नावे पुढीलप्रमाणे, मोरगांव, मणेरी, क्रंब्रल, कळणे/भिकेकोनाळ, कळणे/ फोंडीये, कोलझर, कोलझर/ उगाडे, कुडासे, माटणे, वझरे-गिरोडे/ वझरे, वझरे-गिरोडे/ गिरोडे, वझरे- गिरोडे/ वझरे, पिकुळे, आयी, झेरे-2 आंबडगाव, उसप, केर- भेकुर्ली/ केर, केर –भेकुर्ली/ भेकुर्ली, बोडदे/ आवाडे, साटेली भेडशी, साटेली भेडशी, आयनोडे हेवाळे केंद्र पुर्नवसन, घोटगेवाडी, बोडदे अशा एकूण 25 गांवमध्ये  अंगणवाडी मदतनिस भरती होणार आहे.

            दोडामार्ग तालुक्यातील ग्रामपंचायत महसूल गावातील इच्छूक व पात्र महिला उमेदवारानी अर्ज दि. 22 फेब्रुवारी ते 6 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्या वगळून) कार्यालयीन वेळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प दोडामार्ग कार्यालयात अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.  अधिक माहितीसाठी प्रकल्प  सरपंच ग्रामपंचायत कार्यालय व बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प कार्यालयात दोडामार्ग 02363 256506,9421029556 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा