You are currently viewing ती आता झालीय .. वणवा …..

ती आता झालीय .. वणवा …..

*डॉ.शिवचरण उजैनकर फाउंडेशन (मुक्ताई नगर) चे सन्मा. सदस्य लेखक कवी मनोहर पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ती आता झालीय .. वणवा ……*

 

———————————

हो आता ती पेटलीय

स्वाभिमानाने…… !

स्वत्वासाठी ठामपणे

उभी राहून……..!

 

ती झालीय पेटता

निखारा घेवून……!

विखारी रान पेटवायला

वणवा व्होवून……!

 

ती आता निर्भर

झालीय…. लढाईसाठी

आत्मभान ठेवून……

अस्तित्वासाठी…..!

 

वणवा झालीय ती !

माजलेल्या जंगलात

श्वापदांना भक्ष्य……

करण्यासाठीच….!

 

फेकलीत तीने जुनी

पारंपारिक जोखड…..

अन् श्वेत वस्त्रे ही….!.

नवी वस्रे परिधान… करून…..!

 

आता तीच करेल….

सत्याचा निवडा अन्

देईल शिक्षाही…….!

सुड म्हणून नव्हे तर …

 

आत्मसन्मान …… मिळविण्यासाठीच

तीच…….!!

ती करेल दोन हात !

परिस्थितीशी अन्…… आक्रमक माणसांशी ही .

 

ती आहे नव्या युगाची

सावित्री अन्… रमाई…..! तसेच….

जिजाऊ कणखर ….!

स्वराज्य निर्माण करणारी

लढाऊं नारी शक्ती…..!

 

तीच नर रत्नाची खान

नकाच डिवचू तीचा

आत्मसन्मान !

नका करू अपमान !

 

पेटवेल ती आता हाती

लेखणी घेवून रान…..

अन लावेल वणवा….. !

मुजोर मदमस्त वस्तीला

नका जावू तीच्या….. वाटेला ..!!

 

……………….

नवीन सुर्योदयासाठी..!

 

मनोहर .✍🏽

प्रतिक्रिया व्यक्त करा