मालवण
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, श्री मार्गेश्वर क्रीडा मंडळ -हडी व ग्रामस्थ हडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शाळा हडी – नं.२ येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन दिपप्रज्वलनाने व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले. यावेळी सरपंच महेश मांजरेकर, पुजा तोंडवळकर, जीजी हडकर, भाई मुणगेकर, रुपेश कावले व मार्गेश्वर क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सचिव किशोर नाचणोलकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान मालवण-देवगड चे समूह संघटक मनोज दुधवडकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान मालवण -सचिव दत्ता पिंगुळकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान मालवण -खजिनदार सिद्धेश धुरी तसेच एस.एस.पी.एम. मेडीकल कॉलेज व लाईफटाईम हॉस्पिटल,पडवे कुडाळ चे वैद्यकीय अधिकारी डॉ.जनार्दन बावणे, मनिष यादव, पूजा गुरव, प्रणया वळंजू, स्वप्नाली मेस्त्री, सुमित मुकादम व संतोष जाधव उपस्थित होते. यावेळी पुजा तोंडवळकर, दीपाली सुर्वे, आर्या गावकर या तीन महिलांनीही रक्तदान केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.आर.एस.कुलकर्णी यांनी मार्गेश्वर क्रीडा मंडळाचे व कार्यकर्त्यांचे आभार व अभिनंदन केले.