इंद्रायणीनगर, भोसरी / (प्रतिनिधी-बाबू डिसोजा) :
श्री टागोर शिक्षण संस्थेचे श्री टागोर माध्यमिक विद्यालय मध्ये एस एस सी बोर्ड परीक्षा मार्च 2024 मधील इ. दहावीतील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व पुढील वाटचालीसाठी ‘शुभचिंतन समारंभ ‘ अर्थात ‘निरोप समारंभ ‘ नुकताच पार पडला.
यावेळी टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व अण्णासाहेब मगर बँकेचे चेअरमन श्री. नंदकुमार लांडे पाटील , संस्थेचे सचिव श्री सुरेश फलके ,प्रमुख पाहुणे प्रीतम प्रकाश कॉलेज चे प्रा,पांडुरंग भास्कर सर , प्रसिध्द निवेदक भाऊसाहेब कोकाटे उपस्थित होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे यांनी उद्याचा विद्यार्थी कसा असावा ? या विषयी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर प्रा भास्कर सर यांनी मुलांना परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर विद्यार्थांना संबोधित केले .संस्था सचिव सुरेश फलके यांनी एस.एस. सी. बोर्ड परीक्षा करीता परीक्षार्थीना शुभेच्छा दिल्या.
या वेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कीर्ती माने , समर्थ मुरमे , अक्षता साठे ,साक्षी पाखरे ,संचित थोरात,संजना उबाळे,दिव्य भोंडवे यांनी शाळेतील बालवाडी ते दहावी या शिक्षण काळातील आपल्या आठवणी ,किस्से सांगितले.
लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत आगे,परीक्षा केंद्र संचालक व श्री टागोर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष काळे, श्री स्वामी समर्थ माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री ढोले उध्दव ,प्राथमिक मुख्याध्यापिका मनीषा गुरव, शशिकांत ताटे,दिलीप पाटील , जागृती ठाकरे ,प्रदीप थोरात पर्यवेक्षक श्री शिंदे .एस आर , तसेच वर्ग शिक्षक संतोष सुलाखे ,माया पाटोळे,विठ्ठल बुळे हे सर्व सहशिक्षक उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक सागर हिरवे यांनी केले . आभारप्रदर्शन रवी बापू खंदारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी फुगे गणेश आबासाहेब मस्तुद, चौघुले मावशी यांनी परिश्रम घेतले.