You are currently viewing दोडामार्ग तालुक्यात लिजंड्स खेळाडू पुन्हा आले एकत्र

दोडामार्ग तालुक्यात लिजंड्स खेळाडू पुन्हा आले एकत्र

दोडामार्ग तालुक्यात लिजंड्स खेळाडू पुन्हा आले एकत्र

मार्चमध्ये रंगणार ‘दोडामार्ग लिजंड्स’ चा थरार…

ओरोस

आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर आपल्या गावातील संघाला अनेक विजय मिळवून देणारे,आतासारखी सुविधा,पैसा नसतानाही प्रतिकूल परिस्थितीत क्रिकेटमध्ये प्रतिथयश संपादन करणारे दोडामार्ग तालुक्यातील ४० वर्षावरील खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावर खेळ दाखविण्याची संधी ‘दोडामार्ग लिजंड्स’ क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने दिली जात आहे.मार्च महिन्यात १७ व १८ ला या स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल साटेली भेडशी याठिकाणी आयोजित करण्यात आली असल्याचे माहिती या स्पर्धेचे संयोजकांनी दिली आहे.

या ज्येष्ठ खेळाडूंना पुन्हा एकदा एकत्र आणण्यासाठी ही स्पर्धा भरवण्यात येणार आहे.या स्पर्धेच्या नियोजनाची बैठक नुकतीच साटेली भेडशी येथे संपन्न झाली.यावेळी जय भोसले,लवू खानोलकर,प्रमोद गवस, राकेश महाजन, अमित देसाई,बाबा मयेकर, निलेश तळणकर, प्रवीण गवस, महेंद्र करमळकर,कृष्णा नाईक, शाम नाईक,चंद्रा आयनोडकर,शाबी तुळसकर, विजय गवस,राजेश फुलारी,शानी बोर्डेकर यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.

यावेळी जय भोसले यांनी स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती देत या स्पर्धेचा हेतू स्पष्ट केला.माजी ज्येष्ठ खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावर आणण्यासाठी, त्यांच्यातील क्रिकेटचा जलवा पुन्हा एकदा दिसावा. यादृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती यावेळी संयोजकांनी दिली.

या स्पर्धेत जसे खेळाडू सहभागी होतील तसे संघ वाढवले जातील.सद्यस्थितीत १३० खेळाडूंनी नोंदणी केलेली आहे.त्यामुळे ८ संघ या स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज आहेत.आयपीएलच्या धर्तीवर ही स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेत सर्व सहभागी खेळाडूंना संपूर्ण क्रिकेटचा ड्रेस देण्यात येणार आहे.या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख २० हजार रुपये व आकर्षक भव्य चषक,उपविजेत्या संघाला रोख १० हजार रुपये व आकर्षक भव्य चषक तर उपांत्य फेरीतील पराभूत संघाना रोख पारितोषिक व चषक प्रदान करण्यात येणार आहे.तसेच प्रत्येक सामन्यात सामनावीर,उत्कृष्ट गोलंदाज,उत्कृष्ट फलंदाज याबरोबरच मालिकावीर यांच्यासाठी रोख पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे.तसेच तालुक्यातील सहभागी सर्व लिजंड्स खेळाडूना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी जय भोसले ९३७०९२१७९३, लवू खानोलकर ९४२३३०२०७६, प्रमोद गवस ९३२६८९५३९४, निलेश तळणकर ९४२११४५३२४ , राजेश फुलारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केलं आहे.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा