You are currently viewing मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत साटेली केंद्र शाळेचा प्रथम

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत साटेली केंद्र शाळेचा प्रथम

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत साटेली केंद्र शाळेचा प्रथम

दोडामार्ग

साटेली भेडशी येथील श्री सातेरी केंद्रशाळा साटेलीने ‘ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ स्पर्धेत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. साटेली केंद्रशाळा तीन लाखांच्या प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यातील नऊ आदर्श शाळांमध्ये साटेली केंद्र शाळा असून तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावणारी ही आदर्श शाळांमधील एकमेव शाळा आहे.शाळेच्या या यशाबद्दल शिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर, दोडामार्गचे गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत,उपशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात, गट शिक्षणाधिकारी निसार नदाफ (दोडामार्ग), गट शिक्षणाधिकारी कल्पना बोडके (सावंतवाडी ), केंद्रप्रमुख दीपा दळवी,सूर्यकांत नाईक ,गुरुदास कुबल, राजलक्ष्मी लोंढे व महादेव आव्हाड यांनी अभिनंदन केले.दरम्यान,मोरगाव येथील केंद्रशाळेने दुसरा तर कुंभवडे येथील पूर्ण प्रथामिक शाळेने तिसरा क्रमांक पटकावला.

साटेली केंद्रशाळा उपक्रमशील शाळा आहे.तालुका व जिल्हा स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये या शाळांचे विद्यार्थी देदीप्यमान कामगिरी करत आहेत.शिवाय शाळेची गुणवत्ता टिकवण्यासाठी शिक्षक मेहनत करत असतात.त्यामुळेच शाळेला आदर्श शाळेचा दर्जा प्राप्त झाला आहे.शाळेने आतापर्यंत विविध पुरस्कार आणि किताब मिळवले आहेत.’ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ या अभियानात प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याने शाळेच्या शिरपेचात आणखी एका तुऱ्याची भर पडली आहे.शाळेचे मुख्याध्यापक पूनम पालव,दीपक दळवी रामा गावस संपदा दळवी, संजीवनी आवडन या सर्वांनी अथक परिश्रम केल्याने शाळेचा प्रथम क्रमांक आला.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा