You are currently viewing स्मृति भाग ५३

स्मृति भाग ५३

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ५३*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आजपासून आपण दक्ष स्मृतिचा विचार करु. सर्वप्रथम गलवान घाटीत चीनच्या नालायक सैनिकांना मारत मारत वीरगति प्राप्त आमच्या भारतमातेच्या लाडक्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो . आता सुरवात करु . दक्ष स्मृतिमधे एकूण सात अध्याय येतात . अध्यायांना नावे नाहीत . पहिल्या अध्यायात पंधरा , दुसर्‍यात अठ्ठावन्न , तिसर्‍यात एकतीस , चवथ्यात वीस , पाचव्यात तेरा , सहाव्यात एकोणावीस व सातव्यात चोपन्न , अशी श्लोक संख्या आहे . सर्वप्रथम दक्ष कोण होते ? ते पहिल्या श्लोकात वर्णन केले आहे .

 

*सर्वधर्मार्थतत्वज्ञः सर्ववेदविदां वरः ।*

*पारगः सर्व्वविद्यानां दक्षो नाम प्रजापतिः ॥*

धर्म आणि अर्थाच्या सर्व तत्वांना जाणणारे , सर्व वेदांना जाणणार्‍यात श्रेष्ठ , सर्व विद्यांना जाणणारे दक्ष प्रजापति झाले .

हा पहिला श्लोक झाल्यावर काय समाविष्ट आहे , त्याचे श्लोक व ब्रह्मचारीव्याख्या व कर्म येते .

 

*अनाश्रमो न तिष्ठेत्तु दिनमेकमपि द्विजः ।*

*आश्रमेण विना तिष्ठन् प्रायश्चित्तीयते हि सः ॥*

द्विजाने एक दिवसही आश्रमाशिवाय राहू नये . जो आश्रमाशिवाय राहतो , तो प्रायश्चित्ताचे योग्य होतो .

आज ३६५ दिवसात १५०दिवस शाळा !! बाकी सुटीचा वेळ !!!! त्यातही रोज फक्त पाचच तास शाळा म्हणजे ३६५ दिवसx २४ तास=८७६०तासांपैकी ७५०तास शाळा !!!!! त्यामुळे आम्हाला जीवनात काय करायचे आहे ? हेच माहित नाही !!! द्विजाने एक दिवस ही आश्रमाशिवाय राहू नये , असे सांगण्याचा अर्थ — त्याने संतत अभ्यासाशी व आश्रमातील कर्मयोगाशी निगडीत असावे , असा आहे . ही सूचना जशी स्नातकाशी संबंधीत आहे , तशी शिकवणार्‍या अध्यापक वा गुरुंविषयी पण असावीच ना ? आजकाल तीव्र बुद्धि , तीक्ष्णबुद्धि , कुशाग्रबुद्धि , तैलबुद्धि , प्रत्युत्पन्नमति इ . बुद्धिचे पर्यायी शब्द जावून *आरक्षित बुद्धि* हा नवीन पर्याय तयार झाला ! आदरणीय बाबासाहेबांचा *सर्व समाजातील प्रत्येकाचा उत्कर्ष — आर्थिक आणि बौद्धिक ही !* हा हेतू अजून ही साध्य झाला नाही !! आपल्या देशात आरक्षण केव्हा सोडावे ? याचे बन्धनच नाही !! पाच पाच पिढ्या आरक्षित म्हणून जगतील तर ऐतखावूपणा वाढेल का मतिमांगल्य वाढेल ? सरकार , न्यायालय वा निर्वाचन आयोग वा अन्य विचारवन्त !!!??? यांना काय म्हणावं ? हे शान्त !! अजून खूप समाजबान्धव खितपत पडलेले नजरेस पडतातच !! आमचे सर्वार्थाने उन्नतिकरण झाले तर ती खरी श्रद्धांजली असेल बाबासाहेबांना !!

भाषासामर्थ्य खलास झाले !! शब्दांचे अर्थाशिवाय , व्याकरणाशिवाय शिकवणे सुदृढ झाले आणि मातृभाषा खलास होत गेली !!! त्यात पुन्हा परकीय भाषेची गुलामी करणारे राजकारणी पाहिले की शरमेने मान खाली जाते !!

पुढे ब्रह्मचारी , गृहस्थ , वानप्रस्थी व सन्यासी कसा ओळखावा ?? हे सांगून त्यातील एकही लक्षण नसेल तर तो प्रायश्चित्त योग्य समजावा , हे स्पष्ट मत व्यक्त केले आहे . उद्या काही श्लोक पाहू .

आज थांबतो . तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा