You are currently viewing जीवनात वागण्याचे संस्कार शिकवणारी मराठी भाषा -‌ राजेंद्र गोसावी

जीवनात वागण्याचे संस्कार शिकवणारी मराठी भाषा -‌ राजेंद्र गोसावी

*जीवनात वागण्याचे संस्कार शिकवणारी मराठी भाषा -राजेंद्र गोसावी*

बांदा केंद्र शाळेत मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा

*बांदा*

अमृताते पैजा जिंकू शकणारी अशी मराठी भाषा जीवनात वागण्याचे संस्कार शिकवत असते असे प्रतिपादन साहित्यिक राजेंद्र पांडुरंग गोसावी यांनी जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१येथे केले.
थोर साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठीभाषा गौरव दिन बांदा केंद्र शाळेत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी शाळेत राबविण्यात येणाऱ्या मान्यवर आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत साहित्यिक राजेंद्र गोसावी व वाफोली येथील कवी कृष्णा जनार्दन गवस यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधला .
यावेळी विद्यार्थ्यांना कविता कशी तयार होते याची माहिती देऊन विद्यार्थ्यांना विषय देऊन त्यावर कविता तयार करून घेण्यात आल्या यावेळी शीघ्र कवी हजरजबाबीपणे उत्तर देणाऱ्या दुर्वा नाटेकर ,स्वामिनी तर्पे,आर्या शिंगडे, युवराज नाईक,वेदांत वीर तसेच विविध स्पर्धात सुयश मिळवत असलेल्या सर्वज्ञ वराडकर या विद्यार्थ्यांना राजेंद्र गोसावी यांनी रोख रक्कम व आम्ही बालकवी सिंधुदुर्ग यांच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यादिवशी विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यिकांची ओळख करून दिली तसेच स्वरचित कवितांचेही गायन केले.तसेच पाठ्यपुस्तकातील सर्वच कविता पाठांतर असलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.यावेळी साहित्यिक राजेंद्र गोसावी यांनी शाळेतील दोन होतकरू विद्यार्थ्यांनींना शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी आर्थिक स्वरूपात मदत केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये यांच्यासह सर्व शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − thirteen =