मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
सरहद कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स, कात्रज, पुणे येथे कला शाखेतर्फे कला आविष्कार आंतरराष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन सोहळ्या अंतर्गत स्वरचित कवितावाचन स्पर्धा, भारूड व पोवाडा सादरीकरण स्पर्धा आणि लोकनृत्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, विद्यार्थ्यांमधील भाषिक कौशल्यांचा विकास व्हावा या आंतरमहाविद्यालयीन आयोजन केले होते. हेतूने स्पर्धेचे सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सत्पाळा, विरार (पश्चिम) येथील विद्यार्थी प्रिय प्राध्यापक जगदीश संसारे यांना विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन व मार्गदर्शन करून स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी बेस्ट कल्चरल हेड आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रसंगी सरहद संस्थेचे विश्वस्त शैलेश वाडेकर, उपप्राचार्य डॉ. संगीता शिंदे, कला शाखा व मराठी विभाग प्रमुख डॉ. वंदना चव्हाण हे मान्यवर आवर्जून उपस्थित होते.