वैभववाडी,
२४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग,सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आयोजित व राजापूर अर्बन को- ऑपरेटिव्ह बॕक शाखा वैभववाडी पुरस्कृत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिनांक २४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनी आयोजित केला आहे. दि.२४ डिसेंबर “राष्ट्रीय ग्राहक दिन” कार्यक्रम वैभववाडी तहसील कार्यालयामध्ये तहसिलदार
मा.रामदास झळके यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ठिक १० वा.आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वैभववाडीचे पोलीस निरीक्षक श्री.अतुल जाधव तर प्रमुख उपस्थित मान्यंवर म्हणून वाभवे- वैभववाडी नगरपंचायतचे मुख्याधिकारी श्री.सुरज कांबळे, महावितरण वैभववाडीचे उप कार्यकारी अभियंता श्री.कृष्णात सुर्यवंशी व राजापूर अर्बन बॕकेचे शाखा व्यवस्थापक श्री.संतोष नारकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने मागील वर्षी तसेच यावर्षी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच संस्थेने काढलेल्या संस्थेच्या “माहिती व कार्यदिशा” या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला निबंध स्पर्धेतील विजेते स्पर्धक,संस्था पदाधिकारी, ग्राहक चळवळ संबंधित व्यक्ती,व्यापारी, दुकानदार, विक्रेते व ग्राहकांनी सर्व नियमांचे पालन करुन उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार रामदास झळके, पुरवठा अधिकारी रामेश्वर दांडगे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य व ग्राहक पंचायत महाराष्ट्र- सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील, संघटक श्री.एकनाथ गावडे व कोषाध्यक्ष श्री.संदेश तुळसणकर
यांनी केले आहे.