You are currently viewing शासकीय कार्यालयात २७ फेब्रुवारी कोकण मराठी साहित्य परिषद पदाधिकारी मराठी भाषेविषयी जनजागृती करणार

शासकीय कार्यालयात २७ फेब्रुवारी कोकण मराठी साहित्य परिषद पदाधिकारी मराठी भाषेविषयी जनजागृती करणार

शासकीय कार्यालयात २७ फेब्रुवारी कोकण मराठी साहित्य परिषद पदाधिकारी मराठी भाषेविषयी जनजागृती करणार

सावंतवाडी

बँक, शासकीय कार्यालयात हिंदी आणि इंग्रजी भाषेत संवाद नको तर मराठी भाषेतच संवाद साधला पाहिजे म्हणून मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने उपक्रम हाती घेतला आहे अशी माहिती अध्यक्ष अँड संतोष सावंत यांनी दिली.
मराठी भाषा समृद्ध आहे. त्यामुळे मराठी भाषेत संवाद साधला पाहिजे म्हणून उद्या मंगळवार दि.२७ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता बँक, शासकीय कार्यालयात जाऊन कोकण मराठी साहित्य परिषद पदाधिकारी जनजागृती करणार आहेत.

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने एक वेगळा उपक्रम हाती घेतला आहे सर्व बँकांमध्ये व शासकीय कार्यालय, हॉस्पिटल येथे जाऊन मराठी भाषेविषयी जनजागृती करावी व तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेतच संवाद साधावा असे आवाहन केले जाणार आहे. सर्रासपणे बँकेतील अधिकारी कर्मचारी हे नागरिकांशी संवाद साधताना हिंदी – इंग्रजी भाषेचा वापर करतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे आपली बोली भाषा मराठी आहे त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी संवाद मराठी भाषेत साधावा या हेतूने कोकण मराठी साहित्य परिषदेने हा उपक्रम हाती घेतला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा