“ती”……!!

“ती”……!!

“ती”……!!

तिचं एक बरं होतं
ती खळखळून हसायची, मुक्तपणे…
खोलवर पहात त्याच्या भाबड्या डोळ्यात,,
तो मात्र हरवून जायच्या, तिच्या त्या हसण्यात..

तिचं एक बरं होतं,,
ती तोंड भरून बोलायची, अगदी बिनधास्त,,
मन मोकळं करायची, त्याच्यासमोर,,
तो तिची सुख-दुःख कवटाळून ठेवायचा, आपल्या उरात…

तिचं एक बरं होतं,,
ती हक्काने मागायची, त्याची साथ,
काही क्षण का असेना, बसायची पुढ्यात,,
तो सोबतीला ती असतानाही, असायचा एकांतात…

तिचं एक बरं होतं,,
ती हाती हात घ्यायची, घट्ट पकडायची,,
तिला धीर वाटे हाती घेऊन, त्याचा हात,,
तो त्या हाताच्या स्पर्शानेच न उरे, स्वतःच्याच देहात..

तिचं एक बरं होतं,,
ती कधी घट्ट मिठीत यायची, थरथरायची,,
आपल्या हृदयातली कंपन त्याला ऐकवायची,,
तो नासमज, हरवून जायचा तिच्याच स्वप्नात..

तिचं एक बरं होतं,,
कधीच गुंतली नव्हती ती, त्याच्यात…
तिने जपलं होतं तिचं भावनिक नातं,,
तो मात्र जागा शोधत राहिला, कायमचाच तिच्या हृदयात…

(दिपी)
८४४६७४३१९६
Òदीपक पटेकर …..✒

प्रतिक्रिया व्यक्त करा