बांदा – आरोंदा शहरात घुसलेल्या बांगलादेशिंना अटक केल्याबद्दल आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग पोलीस दलाचे केले अभिनंदन
भारतात प्रवेश करण्यामागे त्यांचा हेतु काय होता याबाबत कसून चौकशी करण्याच्या दिल्या सूचना
कणकवली :
बांदा शहरात बळवंत नगर परिसरात अवैधर रित्या राहणाऱ्या सहा- व आरोंदा येथे चार बांगलादेशींना बांदा पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी सकाळी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे. यामध्ये पाच पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. तर आरोदा येथे चार जणांचा समावेश होता.
कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना एक निवेदन दिले आहे यामध्ये म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथे ६ व आरोंदा येथे १० अशा दोन ठिकाणी पोलिसांनी छापा मारून १० बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्याबद्दल सिंधुदुर्ग पोलिस दलाचे आमदार नितेश राणे यांनी अभिनंद केले आहे.
तर त्यांनी दिलेल्या पत्रकार असे म्हटले आहे की, हा प्रकार गंभीर असून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याने सदरहू बांगलादेशी नागरिकांची कसून तपासणी करून त्यांनी भारतात प्रवेश कसा केला ? त्यांना कोणी मदत केली ? त्यांचे साथीदार कोण ? सिंधदुर्ग जिल्ह्यामध्ये अजून त्यांचे साथीदार आहेत का ? त्याचप्रमाणे बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश करण्यामागे त्यांचा हेतु काय होता ? या दृष्टीने तपास करून जनतेच्या मनात निर्माण झालेली भिती दूर करावी, असे म्हटले आहे.