तळेरे
शिक्षकांच्या साहित्य प्रज्ञेचा शोध घेण्यासाठी तसेच भाषा आणि साहित्य अध्यापनाच्या आशय समृद्धीसाठी आम. कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या *शिक्षक साहित्य संमेलन* संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांची राज्यव्यापी साहित्य संमेलन दरवर्षी घेतले जाते. आतापर्यंत मुंबई, ठाणे, बुलढाणा, रत्नागिरी, गोंदिया, विरार येथे नऊ शिक्षक साहित्य संमेलने दिमाखात पार पडलेली आहेत. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन ऑनलाईन पद्धतीने घेतले जाणार आहे.
या साहित्य संमेलनानिमित्ताने *शिक्षकांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.*
*प्रार्थना वाचन गायन स्पर्धा-*
स्पर्धा प्रमुख – संजय शिंदे 9892276831, अन्वर मिर्झा 8779196580, संजय गवांदे 9869041664
*बाल व कुमार वयोगटातील मुलांसाठी संस्कारक्षम व मूल्यांवर आधारित कथा लेखन स्पर्धा–*
स्पर्धा प्रमुख – राधिका महांकाळ 9769513030, शामल पाटील 9833788536
*सचित्र कविता स्पर्धा-*
राम अहिवले 7843091957. अशोक सुंबे 9702509787
*मला समजलेली भारतीय संविधानाची प्रास्ताविका या विषयावर लेखन स्पर्धा-*
स्पर्धा प्रमुख – मारुती शेरकर 9867708408, ज्योती खांबे 9869055914.
आदी स्पर्धांचा समावेश आहे. या स्पर्धांत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी त्या त्या स्पर्धा प्रमुखांच्या व्हाट्सॲप क्रमांकांवर आपल्या प्रवेशिका पाठवाव्या. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2020 आहे.
*बक्षिसांचे स्वरुप-*
प्रथम पारितोषिक 2000 रुपये व सन्मानपत्र, द्वितीय पारितोषिक 1500 रुपये व सन्मानपत्र, तृतीय पारितोषिक 1000 रुपये व सन्मानपत्र तसेच उत्तेजनार्थ 500 रुपये व सन्मानपत्र असे आहे.
सहभागी सर्व स्पर्धक शिक्षकांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त शिक्षक बांधवांनी सहभाग घ्यावा,असे आवाहन शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे अध्यक्ष प्रा. जयवंत पाटील, कार्यवाह मारुती शेरकर यांनी केले आहे.अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे,राज्य प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, प्रमुख कार्यवाह सुरेश चौकेकर,संघटक समीर परब यांनी केले आहे.