*शिकत राहिल्यास उत्कर्ष नक्की*
प्रा.डाॅ.मंगेश कराड: ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात कौशल्य विकास कार्यशाळेचा समारोप
पुणे
सहाय्यक कर्मचारी हा कुठल्याही संस्थेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग असतो. हे कर्मचारी खऱ्या अर्थाने संस्थेचा गाडा हाकत असतात. असे असले तरी या कर्मचाऱ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करायला हवीत, व त्यासाठी कायम शिकत राहण्याची वृत्ती त्यांनी अंगी जोपासायला हवी. कारण शिकत राहिल्यास आयुष्यात प्रत्येकाचा उत्कर्ष नक्की होतो, असे मत एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड यांनी मांडले.
ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे सहाय्यक कर्मचारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित व दोन महिने चाललेल्या कौशल्य विकास कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ. अनंत चक्रदेव, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डाॅ.ज्ञानदेव निलवर्ण, डाॅ.अतुल पाटील, डाॅ.मोहन मेनन, विठ्ठल चालीकवार, प्रा.श्रीकांत गुंजाळ आदी उपस्थित होते.
प्रा.डाॅ.कराड पुढे म्हणाले, १९८३ प्रा.डाॅ.विश्वनाथ कराड सरांनी महाराष्ट्रातील पहिल्या खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापन केली. तेव्हा, कोणालाही कल्पना नव्हती की, कराड सर लावत असलेल्या छोट्याशा रोपट्याचा भविष्यात मोठा एवढा मोठा वटवृक्ष होईल. आज एमआयटी शिक्षण समुहांत हाजारों कर्मचारी अत्यंत निष्ठेने काम करतात. त्यांची निष्ठा व कराड कुटूंबियांवरील प्रेमामुळे भविष्यातही एमआयटीच्या बाहू आणखी विस्तारत राहतील यात कुठलीही शंका नाही, असेही डाॅ.कराड यावेळी म्हणाले.
याप्रसंगी प्र.कुलगुरू डाॅ.चक्रदेव, डाॅ.चोपडे, डाॅ.निलवर्ण यांनी देखील भाषण करताना कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यासह वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यावेळी पुरस्कार देऊन सन्मान देखील करण्यात आला. विश्वशांती प्रार्थनेने प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली.
कर्मचाऱ्याच्या सर्वांगीन विकासावर भर
एमआयटी एडीटी संकुलात कुठल्याही पदावर रुजू होणारा कर्मचारी स्वावलंबी बनेल व तो त्याच्यातील आवडी-निवडी ओळखून सातत्याने नव-नवीन कौशल्य आत्मसात करेल यासाठी आम्ही बांधील आहोत. एमआयटी एडीटी विद्यापीठात शिपाई, क्लर्क, स्वच्छता कर्मचारी म्हणून रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या देखील सर्वांगीन विकासावर लक्ष केंद्रीत केले जाते ज्यामुळे ते वैयक्तिक तसेच कार्यालयीन आयुष्यात प्रगती साधतात, असेही प्रा.डाॅ.कराड यावेळी बोलताना म्हणाले.
*संवाद मीडिया*
🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕
*mai hyundai*
*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*
*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/
*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*
*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*
*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*
*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*
*फो. +91 7410006037*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*