You are currently viewing काव्यपुष्प-५४ वे

काव्यपुष्प-५४ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण देशपांडे लिखित श्री.गोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*

 

*काव्यपुष्प-५४ वे*

—————————————–

श्री काशी यात्रेला आरंभ झाला । पहिला पडाव तो नाशिकला । गोदावरीचे स्नान, सोहळा आटोपला । श्रीराम दर्शन घेऊन ।। १ ।।

 

नाशकाहून प्रयागला पोंचले । त्रिवेणी संगमी आईला नेले ।

स्नान तिजला घातले । मग वेणीमाधव पुजीला आईने ।। २।।

श्री महाराजानी प्रयागला । तीन दिवस मुक्काम केला ।

दर्शन घडले, दानधर्म झाला । हस्ते गीतामाईच्या ।। ३ ।।

 

काशीला येण्याआधी महाराजानी एक केले । मसूरियादीन

शिवमंगल नामे शिष्यास पत्र लिहिले । येण्याचे कळवले त्यासी ।। ४ ।।

 

श्री महाराजांचे स्वागत करण्याला । काशी स्टेशनवर स्वतः

मसूरियादीन आला । वाजतगाजत घेउनी गेला । महाराजांना गंगामहाली ।। ५ ।।

 

शिष्य मसूरियादीन काशीवाला । मोठा धनवान लौकिकवाला । काशी राजाशी याचा स्नेह मोठा भला ।

शिष्याची या पीडा दूर झाली श्रीमहाराज कृपेने ।। ६ ।।

 

कवी- अरुणदास करी क्रमशः लेखन श्रीराम कृपेने ।।

—————————————–

श्री गोंदवलेकर महाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-५४ वे

कवी- अरुणदास – अरुण वि.देशपांडे-पुणे.

——————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा