*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुण देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। जय गजानन ।। गण गण गणात बोते ।।
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- ३४ वे
अध्याय – ६ वा, कविता – चौथी
————————————–
श्री स्वामी गजानना । करितो प्रार्थना । प्रेरणा द्यावी लेखना ।
कवी अरुणदासाला ।।१ ।।
श्री गजानन नित्य स्मरावे । पारायण नियमित करावे ।
सार्थक करावे । आपल्या दिनकर्माचे ।। २ ।।
सांगतो पुढील कथाक्रम । आहे मोठा मनोरम । तैसाचि संस्कारक्षम । ग्रंथ गजानन विजय हा ।। ३ ।।
नित्य करिती भ्रमण । श्री स्वामी गजानन । करिती कल्याण।
आपुल्या भक्तांचे ।। ४ ।।
चंद्रभागेच्या तीरी । शिवर गाव ,दर्यपूर शेजारी । ब्रजभूषण
इथे वास करी । ख्यातनाम जो पंडित, विद्वान ।। ५ ।।
हा बहुभाषिक असे । सर्वत्र याची कीर्ती असे । हा नित्य करीत असे । सूर्योपासना ।। ६ ।।
उपासना याची दृढतर । अंतरी भक्ती खोलवर ।
येउनी चंद्रभागेच्या काठावर । सूर्यास हा अर्घ्य देई ।।७।।
******
क्रमशः करी लेखन कवी अरुणदास
—————————————–
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प- ३४ वे
अध्याय – ६ वा, कविता – चौथी
-अरुण वि.देशपांडे-पुणे
————————————-