You are currently viewing घरेलू कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी शासनाने नोंदणी जीवित असलेल्या कामगारांना संसारपयोगी भांडी संच भेट देण्याचा घेतला निर्णय – स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे

घरेलू कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी शासनाने नोंदणी जीवित असलेल्या कामगारांना संसारपयोगी भांडी संच भेट देण्याचा घेतला निर्णय – स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे

घरेलू कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी शासनाने नोंदणी जीवित असलेल्या कामगारांना संसारपयोगी भांडी संच भेट देण्याचा घेतला निर्णय – स्वाभिमानी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे

कुडाळ

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम 2008 कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल म्हणून घरेलू कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी शासनाने नोंदणी जीवित असलेल्या कामगारांना संसारपयोगी भांडी संच भेट स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत घरेलू कामगारांना प्रसूतीसाठी 5 हजार अर्थसहाय्य व त्यांच्या मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी 2 हजार अशा दोनच योजना अंमलात होत्या. सक्षम व प्रभावी योजना कार्यान्वित नसल्याने घरेलू कामगार देखील नोंदणी व नूतनीकरणाकडे पाठ फिरवित असल्याने जिल्ह्यासह राज्यात घरेलू कामगारांची नोंदणी अतिशय अल्प आहे. शासनाचा हा निर्णय अतिशय स्तुत्य असून घरेलू कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी व योजनेचा प्रसार व प्रसिद्धीसाठी स्वाभिमानी कामगार संघटना सिंधुदुर्गच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावागावात शिबिर व मार्गदर्शक मेळावे आयोजित करणार असल्याची माहीती संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीद्वारे दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा