वेंगुर्ला :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील ‘कासवांचे गाव’ म्हणून ओळखल्या जाणार्या वायंगणी बीच येथे दि. २४ ते २५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणार्या या कासव महोत्सवाचे आयोजन सावंतवाडी वनविभाग आणि समस्त ग्रामस्थ वायंगणी यांच्यावतीने करण्यात आले आहे. सदर कासव महोत्सवास प्रमुख अतिथी म्हणून सन्मानिय केंदिय मंत्री मा. ना. नारायण राणे, पालकमंत्री मा.श्री. रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री मा. ना. श्री दीपकभाई केसरकर, खासदार मा. श्री विनायक राऊत यांची प्रमुख उपिस्थती असणार आहे.
वायंगणी समुद्रिकनारा येथे कासवांच्या प्रजननसाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे वातावरण तसेच कासवांचे अंडी घालणेसाठी अनूकूल अशी जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे दरवर्षी ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवे या वायंगणी समुद्र किनारी वाळूमध्ये नैसिगर्क पदध्तीने अंडी घालण्यासाठी येतात. निसर्गप्रेमींसह पयर्टकांना ऑलिव्ह रिडले कासवांच्या नवजात पिल्लांना त्याच्या नैसिगर्क अधिवासात मुक्त करताना पाहण्याची व त्याच्या विषयी अभ्यास करण्यासाठी ही सुवणर्संधी आहे.
या महोत्सवात तज्ञ अभ्यासकांच्या मागर्दशर्नाखाली कासवाबंददल माहिती पयर्टकांना देण्यात येणार आहे. तसेच विविध दुर्मिळ समुद्र वन्यजीवांची माहिती पयर्टकांना मिळणार आहे. कासवांचा जीवनक्रम व त्याबाबतचे वैज्ञानिक ज्ञान तज्ञांच्या मागर्दशर्नाखाली मिळणार आहे. तसेच निसर्गप्रेमींना ‘कोकणी रानमाणूस’ यांच्यासह कोकणातील स्थानिक लोकांच्या पयार्वरण पूरक जीवनशैलीची अनुभूती घेता येणार आहे. तसेच वायंगणी परिसरातील पारंपरिक घरात राहण्यासह पारंपरिक खाद्य संस्कृतीचा आणि विविध पारंपरिक कला याचा आस्वाद घेण्याची संधी देखील पयर्टकांना मिळेल. निसर्गप्रेमींनी, पयर्टकांनी या कासव महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन सावंतवाडी वनविभाग व ग्रामपंचायत वायंगणी यांनी केले आहे.
तसेच या महोत्सवानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध समुद्रिकनार्यावर असणार्या हॅचरी मधून जसे की फळीयेफोंडा, सागरतीर्थ, उभादांडा, तोंडवली, तळाशील, आचरा, मोचेमाड, इत्यादी ठिकाणाहून पिल्लांना निसर्गात अधिवासात मुक्त करताना स्थानिक कासवमित्रांच्या मदतीने पाहण्याची संधी निसर्गप्रेमींना मे 2024 पर्यंत मिळणार आहे. त्या करिता संबंधित ठिकाणच्या वन विभागाच्या अधिकारी व कमर्चारी यांची परवानगी आवश्यक राहणार आहे.