You are currently viewing वारंवार गैरहजर तलाठी जागी अन्य तलाठी तात्काळ नियुक्त करा

वारंवार गैरहजर तलाठी जागी अन्य तलाठी तात्काळ नियुक्त करा

वारंवार गैरहजर तलाठी जागी अन्य तलाठी तात्काळ नियुक्त करा

माजी उपसभापती राजू परुळेकर यांसह मठबुद्रुक, निरोम, कुडोपी लोकप्रतिनिधिंचे तहसील प्रशासनास निवेदन

मालवण

मठबुद्रुक तलाठी कार्यालय येथील तलाठी वारंवार गैरहजर असतात. मठबुद्रुक, निरोम, कुडोपी या तीन गावांसाठी एक तलाठी असून त्यांच्या कार्यालयातील अनुपस्थितीचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. सातबारा, दाखले व अन्य आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थ्यांचे नुकसान होत आहे. तरी याबाबत योग्य ती कार्यवाही तात्काळ करून अन्य तलाठी नियुक्ती करावी. अन्यथा याबाबत तक्रार पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे सर्व ग्रामस्थांच्या वतीने केली जाईल. अशी भूमिका माजी उपसभापती राजू परुळेकर यांनी मांडली आहे.

मालवण तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी माजी उपसभापती राजू परुळेकर यांसह निरोम सरपंच राजू राऊत, बुधवळे सरपंच संतोष पानवलकर, मठबुद्रुक उपसरपंच विनायक बाईत, मठबुद्रुक तंटामुक्ती अध्यक्ष भाई घाडीगावकर, माजी सदस्य गुरु केळुसकर, अमोल चिंदरकर उपस्थित होते.


तलाठी अनुपस्थिती प्रश्न अनेक महिने आहे. अन्य तलाठी नियुक्ती व्हावी याबाबत मठबुद्रुक ग्रामसभेत ठरावही घेण्यात आला आहे. वाहतूक व संपर्क साधने कमी असणाऱ्या या तीन गावांसाठी एक तलाठी असताना ते वारंवार गैरहजर असल्याने विविध कामांसाठी पायपीट करून येणाऱ्या ग्रामस्थ शेतकरी त्रस्त बनले आहेत. तरी याबाबत त्वरित अन्य तलाठी नियुक्ती बाबत अथवा श्रावण तलाठी यांच्याकडे आठवड्यातून दिवस ठरवून नियुक्ती मिळावी. तसेच बुधवळे कुडोपी ही नवीन सजा झाली असल्याने त्याठिकाणी नवीन तलाठी मिळावे. अशीही मागणी करण्यात आली आहे.

WhatsAppFacebookTwitterTelegramShare

प्रतिक्रिया व्यक्त करा