You are currently viewing तळेरे येथे स्वराज्य सप्ताह २०२४ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

तळेरे येथे स्वराज्य सप्ताह २०२४ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

कणकवली :

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आयोजित केलेल्या स्वराज्य सप्ताह २०२४ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रम आज ज्ञानवर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट तळेरेच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री प्रफुल्ल सुद्रिक, कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पिसे, तालुका कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर डंबे , कणकवली तालुका राष्ट्रवादी पदवीधर सेल अध्यक्ष महेश चव्हाण, कणकवली तालुका शिवसेना कार्यकारिणी सदस्य सुनील हरमलकर, ज्ञानवर्धिनी ट्रस्टचे चेअरमन डॉ. अभिनंदन मालंडकर, प्राचार्य तांबे सर, नर्सिंग शिक्षक सुनील सर, पुष्पा मॅडम, हेमांगी मॅडम, मालंडकर ट्रस्टचे हेमंत मालंडकर उपस्थित होते.

राज्याचा कारभार हा लोकाभिमुख आहे अणि जनतेच्या दरबारात प्रत्येक सामान्य माणसाचे प्रश्न हे प्राधान्याने सोडविण्यासाठी सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे हा संदेश महाराष्ट्रात सर्वदूर जाण्यासाठी स्वराज सप्ताह साजरा करण्यात आला असे प्रतिपादन प्रफुल्ल सुद्रिक यांनी केले.

डॉ मालंडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नर्सिंग महाविद्यालय मधील मुलीनी यावेळी शिवगर्जना, बाल शिवाजी पाळणा, पोवाडा, अफजल खान वधाची एकांकिका सादर केली. ज्ञानवर्धिनी महाविद्यालय प्रांगणात यावेळी जणू शिवशाही अवतरली होती. निबंध स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यातआले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग घेतला होता. ‎

प्रतिक्रिया व्यक्त करा