You are currently viewing सिद्धिविनायक मंदिर बोर्डवे येथे रक्तदान शिबिरात ३३ रक्तदात्यांनी केले रक्तदान

सिद्धिविनायक मंदिर बोर्डवे येथे रक्तदान शिबिरात ३३ रक्तदात्यांनी केले रक्तदान

सिद्धिविनायक मंदिर बोर्डवे येथे रक्तदान शिबिरात ३३ रक्तदात्यांनी केले रक्तदान

रक्तदान हेच श्रेष्ठदान चा मंडळाने दिला संदेश

गणेश जयंती निमित्त ओम शिवशक्ती मंडळाचे सामाजिक बांधिलकीतून आयोजन

कणकवली ( प्रतिनिधी)

ऒम शिवशक्ति सेवा मंडळ बोर्डवे आणि सिद्धिविनायक मंदिर बोर्डवे यांच्यावतीने माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ३३ रक्तदात्यानी रक्तदान केले. समाजात रक्तदान हेच श्रेष्ठदानचा मंडळाच्यावतीने संदेश देण्यात आला.

कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथील सिद्धिविनायक मंदिरात सोमवारी सकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ओम शिवशक्ती मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय एकावडे, सिद्धिविनायक मंदिर बोर्डवेचे विश्वस्त गणेश मोहन शिंदे, मार्गदर्शक अनंत भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.

यावेळी ओम शिवशक्ती सेवा मंडळ बोर्डवेचे सावळाराम शिंदे, प्रथमेश बागवे ,हनुमंत एकावडे, देवदास मोडक, संतोष मोडक, नितेश शिंदे, ओमकार एकावडे, प्रशांत सोहनी, अरुण परब, विनायक शिंदे, शंकर नार्वेकर, नितेश शिंदे ,नरहरी शिंदे, आदींसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

एस.एस.पी.एम पडवे रुग्णालयांतर्गत रक्तपेढी पथकाच्या माध्यामातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी डॉ. संस्कृती कांबळे,, टेक्निकल सुपरवायझर मनिष यादव, टेक्निशियन उल्का आजगावकर, अक्षता केळकर साक्षी बालम ,स्टाप नर्स रेश्मा हरकुळकर, असिस्टंट संतोष जाधव यांनी सेवा दिली. यावेळी ३३ रक्तदात्यांना राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य मंडळाच्या वतीने प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

१३ फेब्रुवारी रोजी गणेश जयंती निमित्त सिद्धिविनायक मंदिर बोर्डवे येथे ऒम शिवशक्ति सेवा मंडळ बोर्डवे यांच्यावतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा.असे आवाहन ऒम शिवशक्ति सेवा मंडळ बोर्डवेचे अध्यक्ष दत्तात्रय एकावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =