You are currently viewing ५१ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान

५१ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान

सावंतवाडी :

 

सावंतवाडी जिमखाना मैदान येथे आयोजित ५१ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सहभागी विज्ञाननिष्ठ प्रयोगशाळा कर्मचारी यांनी सादर केलेल्या प्रायोगिक शैक्षणिक साधनांचे कौतुक केले.

सावंतवाडी येथे दि.१० ते१४ फेब्रुवारी या कालावधीत राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन संपन्न होत आहे. महाराष्ट राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाकडून दरवर्षी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या विज्ञाननिष्ठ प्रयोगशाळा कर्मचारी यांनी सादर केलेल्या प्रायोगिक शैक्षणिक साधनांची दखल घेवून दरवर्षी राज्य महासंघाकडून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवीनगर नागपूर च्या संचालिका डॉ राधा आतकरी व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष श्री.भरत जगताप, राज्य संघटक श्री.टी.एम.नाळे,सांगली जिल्हा अध्यक्ष श्री.राजेंन्द्र कांबळे, सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेचे अध्यक्ष श्री.रामचंद्र काळे, जिल्हा सचिव श्री.राजेंद्र तवटे जिल्हा खजिनदार श्री .विरेंद्र गोसावी उपाध्यक्ष श्री.सुर्यकांत चव्हाण बहुसंख्येने प्रयोगशाळा कर्मचारी उपस्थित होते.

त्यांच्या शुभहस्ते सहभागी झालेल्या प्रयोगशाळा कर्मचारी यांचा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनस्थळी विज्ञान हितासाठी व विज्ञान शिक्षकांना उपयोगी पडणाऱ्या प्रायोगिक शैक्षणिक साधने सादर केलेल्या प्रायोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा परिचर यांचा सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. राधा अतकरी यांनी सहभागी विज्ञाननिष्ठ प्रयोगशाळा कर्मचारी यांनी सादर केलेल्या प्रायोगिक शैक्षणिक साधनांचे कौतुक केले.तसेच राज्य महासंघाचे अभिनंदन केले. विद्यार्थी हितासाठी व विज्ञान शिक्षकांच्या सहकार्यासाठी शाळा तिथे प्रयोगशाळा कर्मचारी आवश्यक आहे. तरच विज्ञाननिष्ठ विद्यार्थी घडणार आहेत. राज्य महासंघाकडून १६ वर्षे पासून प्रयोगशाळा कर्मचारी यांना सन्मानित करण्यात येत आहे असे राज्याध्यक्ष भरत जगताप यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सर्वांचे आभार सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष रामचंद्र काळे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + eleven =