You are currently viewing नेतर्डे येथे ओमनी कार पलटी होऊन अपघात..

नेतर्डे येथे ओमनी कार पलटी होऊन अपघात..

चालक बालंबाल बचावला; गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान…

बांदा
बांदा-सासोली रस्त्यावर नेतर्डे येथील तीव्र वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने ओम्नी मोटार पलटी होऊन अपघातग्रस्त झाली. सुदैवाने या अपघातात चालक बचावला, मात्र ओम्नीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हा अपघात आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास झाला. चालक बांद्याहुन सासोलीच्या दिशेने जात होता. तीव्र उताराच्या वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने ओम्नी रस्त्यालगतच्या घळणीत कोसळून अपघातग्रस्त झाली. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली. गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघाताची नोंद बांदा पोलिसात करण्यात आली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × one =