You are currently viewing प्रेम…!

प्रेम…!

*ज्येष्ठ साहित्यिका, उपक्रमशील आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार, निवेदिका अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*प्रेम…!*

 

रुपे प्रेमाची अनेक

रंग प्रेमाचे अनेक

प्रेम आभाळाचे आणि

प्रेम चंद्राचे सुरेख

 

इथे आईच्या प्रेमाला

कुठे उपमाच नाही

तसे पित्याचे प्रेमही

देई विश्वासाची ग्वाही

 

प्रेम भगिनीचे बघा

जशी बहरली जाई

प्रेम बंधूंचेही इथे

गाणे ममतेचे गाई

 

जीवाभावाचा तो सखा

प्रेम त्याचे मौल्यवान

सख्यासोबत्यांच्यासाठी

देई प्राणाचेही दान

 

प्रेम जीवनसाथीचं

जसं तेवत्या वातीचं

उधाणत्या वादळाचं

आणि भिजल्या मातीचं

 

 

कवयित्री

अनुपमा जाधव

भ्रमणध्वनी ८७९३२११०१७

प्रतिक्रिया व्यक्त करा