You are currently viewing ओंडका अंगावर कोसळल्याने ओवळीयेत तरूण ठार…

ओंडका अंगावर कोसळल्याने ओवळीयेत तरूण ठार…

ओंडका अंगावर कोसळल्याने ओवळीयेत तरूण ठार…

सावंतवाडी

गाडीत लाकुड भरत असताना भला मोठा ओंडका अंगावर कोसळल्यामुळे गोठोस येथील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ओवळीये (ता. सावंतवाडी) येथे घडली. त्याला अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पूर्वी त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. विनायक पांडुरंग तेजम (वय ४४) असे त्याचे नाव आहे. याबाबतची माहिती पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली. याबाबत उशिरा पर्यंत पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा