सावंतवाडी :
सावंतवाडी जिमखाना मैदानावर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग आयोजित सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवाच्या चौथ्या दिवशी रात्री अशोक हांडे प्रस्तुत चौरंग संचलित ‘मराठी बाणा ‘ कार्यक्रम सावंतवाडीकरांसह उपस्थित जिल्हावासियांना आनंदित करणारा ठरला. मराठी सण उत्सव परंपरा यांच्या कार्यक्रमाने रसिक प्रेक्षक भारावून गेले. १५० कलावंतांच्या गीत संगित व नृत्याविष्काराच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
अशोक हांडे यांचे लेखन व संकल्पना असलेला हा गीत गायन वादन नृत्य यांचा सुरेख संगम असलेला कार्यक्रम रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला. गण गवळण अभंग भारुड गोंधळ याला नृत्याचा साज चढवित केलेले सादरीकरण उपस्थित रसिकांना भावले. रसिकांनी या सर्व कार्यक्रमांना उदंड प्रतिसाद दिला.