*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*
*तडजोड*
तडजोडीला आयुष्यात पर्यायच नाही..सुखी समाधानी रहाण्याची ती नामी गुरूकिल्ली आहे….माहेर संपन्न असलं तरी मोठ्यांच्या मनाप्रमाणे काही तडजोडी स्वीकारतोच.तसेच सासरीही…एकदा का आपण *त्या*घरच्या झालो की गुणदोषासकट सगळ्यांना स्वीकारणं अपरिहार्य आहे.हळूहळू समजवून सांगत मनं ,वैचारिकता बदलू शकतो पण त्यासाठी आपण त्यांचे आहोत हा विश्वास संपादन करावा लागतो.इथेही तडजोड आलीच.
नंतर मुलं..पिढीचा फरक, त्यांच्याशीही काही माझं काही तुझं करत आपण जुळवून घेतो.
मुलींची सासरी जातानाही मानसिक तयारी समजुतीने करून द्यावीच लागते.
आणि अत्यंत महत्वाचे ते जवळ असणा-या सुना आल्यावर…..प्रत्येकाची विचारपध्दती वेगळी..खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या हे सर्व गृहीत धरायला हवं.पारंपरिक सण..समारंभात हवे ते बदल करणं आवश्यक..
मी करत आली तर तिनेही करावं हा हट्ट नसावा.तेव्हाची आणि आताची परिस्थिती खूप भिन्न असते..ते आपणच ठरवायला हवं.घर दोघींचं ही भावना आधीपासूनच जपायला पाहिजे…अर्थात तडजोड दोघींनाही करावी लागते पण ती समजून..मैत्रीपूर्ण नात्याने आपुलकीने केली तर घरात आनंदाची फुलं सदैव फुलत रहातात…अजून काही वर्षांनी
विचारलं तरच सल्ला…. चुकत असेल तर सांगणं एवढंच करावं.
नातवंडाचं आनंदाने करतांना
हक्क गाजवू नये.आपल्याला काही गोष्टी पटल्या नाही तरी आजची पिढी,त्यांचे विचार,भावना समजून तडजोड करणंच हिताचं. आपला आदर सन्मान मिळण्यासाठी तडजोड करायला काही हरकत नाही.👍✍️
अरुणा दुद्दलवार
दिग्रस