*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*‘अरे सारस्वतांनो’*
*******************
मी शोधतोय माझ्या स्वप्नातील
देहाकडे घेऊन जाणारी
क्षितिजा पलिकडची वाट
मी शोधतोय गौतमी वृक्ष
आणि शांतीचा मार्ग दाखवणारा
तो बुध्द
सुरू आहे माणसाची
माणसा विरूद्ध लढाई
आणि माजलाय अमाणूषतेचा उद्रेक
निशब्द आक्रोश ऐकतोय मी
म्हणून विनंती करतोय ऐका
परिवर्तनाच्या प्रलयासाठी
या महासागराला
अरे सारस्वतांनो आतातरी
दुर करा काया आणि
अंधश्रद्धेच्या अज्ञानाचं पांघरून
नी हाणून पाडा तुमच्या विचारानी
विध्वसंकाचे सारे कुटील डाव
लेखणी मधील शाईच्या प्रत्येक थेंबाने
मगच घडू शकतो सुजलाम सुफलाम
शांतीचा देश नव्या इतिहासने
कारण कोणीही देह त्याग करू नये म्हणून
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसूमाई)*
९५७९११३५४७