You are currently viewing शुभाकांक्षा

शुभाकांक्षा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते यांनी कवयित्री सुलभा सत्तुरवार यांच्या चांदणफुले या काव्यसंग्रहावर उधळलेली स्तुती सुमने*

 

*शुभाकांक्षा*

************

*विद्यमान कवयित्री श्रीमती सुलभा सुत्तूरवार ही माझी मानसकन्या असल्यामुळे तिला केवळ आशीर्वाद देण्याचे माझे नैतिक कर्तव्य आहे. म्हणून तिला मी माझ्या शुभाकांक्षा देत आहे.*

 

मुळामध्ये सुलभाचे वडील स्व. पांडुरंग पेंडलवार यांच्या सुसंस्कृत सहवासात सुलभाच्यात वाचनवेडाचा , साहित्य निर्मितीचा बीजांकुर रुजला आहे आणि त्यांचे दिवंगत पती स्व.साईनाथ सुत्तूरवार यांनी त्यांच्या म्हणजेच सुविद्य कवयित्रीच्या वाङ्मयीन संस्कारांना अलवार जोपासले आहे ही गोष्ट अत्यन्त नम्रतेने सुलभा मान्य करते आहे. हे अत्यन्त महत्वाचे आहे.

कवयित्रीच्या मनोगतात शिक्षिकेचा पेशात रमल्यामुळे *साहित्य,कला, संस्कृती* या सर्वार्थानेच वैचारिक , प्रबोधनात्मक विवेकी समृद्धीचा वारसा किती फलद्रुप ठरला , भेटलेल्या *गुरुजनांचे आशीर्वाद लाभल्यामुळे आणि भाग्याने जो सरस्वतीच्या ( अंभृणी) कृपादृष्टीचा वरदहस्त लाभला याबाबत कवयित्री सुलभाने आपले प्रांजळ व्यक्त केले आहे.*

 

*चांदण फुले* या पुस्तकाची निर्मिती म्हणजे कवयित्रीचे प्रत्यक्षात साकार झालेले *भावरम्य* कृतीर्थी स्वप्न आहे असे ती सांगते आहे.

कविता ही जन्मावी लागते. ती करता येत नाही , ती प्रसवते हा साक्षात असा *मूलसिद्धांत* आहे. शब्द सरस्वतीची कृपा आहे.तीची साधना ( तपश्चर्या ) आहे आणि ती केलीच पाहिजे हे मात्र निर्विवाद.

*आणि हा कृपाळु सरस्वतीचा आशीर्वाद कवयित्रीला लाभला आहे असेच मी म्हणेन*

*चांदण फुले* हा काव्यसंग्रह 84 रचनांचा एक सुंदर असा विविध विषयांचे भावनिक कंगोरे असलेला दरवळणारा आणि साऱ्या सभोवारी जाणवणाऱ्या लोचनांतरीच्या आकाशगंगेला घट्ट कवटाळून मिठीत घेणारा पुष्पगुच्छ आहे.

स्वरचनेतून प्रांजळी मुक्त व्यक्त होवून काळजाला स्पर्श करणारी शब्दभाव रचना ही खरी रचना असते. आणि समाज हृदयस्थ विराजते.

*कवयित्री सुलभा सुत्तूरवार* या कवयित्रीच्या रचना अशा स्पर्श करणाऱ्या आहेत हेच या *चांदण फुले* काव्यसंग्रहाच सुयश आहे.

या काव्यसंग्रहाला ज्येष्ठ मान्यवर प्रभृतींनी आपले अभिप्राय दिलेले आहेत त्यात *सर्वश्री डॉ. श्रीकांत वामन चोरघडे , श्री . विजयराज बोधनकर , डॉ.चित्रा सोहनी , श्री राजन लाखे , सौ. सीमा गांधी , संतोष धोंगडे आणि प्रकाशक डॉ. स्नेहल तावरे या सर्वांनीच सुविद्य रचनाकार श्रीमती सुलभा सुत्तूरवार यांच्या रचनांचे सुंदर परीक्षण या पुस्तकात केलेले आहे. यातूनच या काव्यसंग्रहाचे मौलिक विश्लेषण जाणवते आहे. त्या सर्वांचा आदर ठेवून त्या समग्र विश्लेषणाची द्विरुक्ती मी करणार नाही.

*पण या सुंदर भावनिक अशा *चांदण फुले* काव्यसंग्रहाचा मनस्वी आस्वाद घेत रहाणार आहे.

श्रीमती सुलभा सत्तूरवार या कवयित्रीला अंत:करणापासून *”माझ्या गुरूंनी मला दिलेला आशीर्वाद”*

*”लिहीत रहा , लिहीत रहा”* हाच एक आशीर्वाद देत आहे….

*।।शुभं भवतु:*।।

 

*इती लेखन सीमा*

*दिनांक : ७ फेब्रुवारी २०२४*

*********************

*वि.ग.सातपुते.*

*अध्यक्ष*,

*महाकवी कालिदास प्रतिष्ठान*

*पुणे, मुंबई, ठाणे , मराठवाडा ( महाराष्ट्र)*

*📞( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा