You are currently viewing गुलाबस्तवन……बत्तीसावे…!!

गुलाबस्तवन……बत्तीसावे…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुलाबस्तवन……बत्तीसावे…!!*

 

आकाशाच्या वक्षावर रंगलावण्य उसळलं

मस्तवाल सिंहासनावर जाऊन बसलास

अस्मितेच्या बिलोरी ईश्वरी आरश्यावर

डोळे दिपेपर्यंत दिपकळ्यांत चमकलांस

 

ईश्वरीरूपात ईश्वरासोबत आगमन तुझे

उत्सव अंगणात साजरा केलास

एकेका पाकळीत जीवनाचे गीत

भारावल्या पोटी तू गात गेलास.

 

महासुखाचा पुर्णसुर्य उगवतीला पेटवला

सुर्यदेव ह्दघरांत आज उगवला

अवकाशी रंगलावण्य अलंकृत पसरून

ह्दयी भावपंचमाचा सूर लावला

 

पाकळ्यांत रेशमी शृंगाराचा बाज

स्पर्शांच्या पालवीत आनंदविभोर झाला

ब्रम्हतेज प्रसन्नतेच तुझ्या मुखतेजात

सुर्यदेवही तुला बघून लाजला..

 

आकाशात ह्दय भगवंत विसरला

शृंगाररूपसंभार प्रेमभावात जपला

माझ्यामनी ईश्वर गाभा-यात बसला

प्रेमपल्लवीच्या आड गुलाब उगवला

 

बाबा ठाकूर

गुलाब दिनाच्या सर्व गुलाबप्रेमींना शुभेच्छापत्र व अभिनंदन!!

प्रतिक्रिया व्यक्त करा