*सावंतवाडी तालुका काँग्रेसची बैठक संपन्न*
*सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस लढणार*
सावंतवाडी तालुका काँग्रेसची बैठक आरपीडी हायस्कूल सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अजिंक्य देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीत प्रभारी अजिंक्य देसाई यांनी बीएलए, बुथ कमिटी, ग्राम कमिटी, मंडल कमिटी याचा आढावा घेतला आणि ज्या ठिकाणी या कमिट्या झालेल्या नाहीत तेथे कमिट्या करण्यासाठी प्रयत्न करावा असे सांगून आगामी निवडणूकांसाठी तयार राहण्याचे आवाहन केले. या वेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे आणि आजही काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो म्हणून कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ लढवावा अशी आग्रही मागणी केली. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसनेच लढवावा अशा प्रकारचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला.सदर ठराव प्रदेशला पाठवून कोणत्या परिस्थितीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच लढवणार असे प्रदेश काँग्रेसला कळविण्याचे ठरविण्यात आले. यावेळी प्रदेश प्रतिनिधी अॅड. दिलीप नार्वेकर, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर,जिल्हा सचिव रविंद्र म्हापसेकर,अमोल सावंत, आनंद परूळेकर,स्मीता वागळे,शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नंद्दीहळ्ळी, माजी नगरसेवक अरुण नाईक, प्रकाश बांदेकर,चंद्रकांत राणे,अन्वर खान,संदिप सुकी,सुधीर मल्हार, अॅड.संभाजी सावंत, सुधीर मल्हार, जस्मीन लक्शमेश्वर, संजय लाड, बाबुराव राऊळ,कौस्तुभ पेडणेकर, प्रमोद परब,फातिमा लक्शमेश्वर, माया चिटणीस,अभय मालवणकर,प्रदिप चौगुले,बासीत पडवेकर,विठ्ठल केदार,आनंद कुंभार, बबन डिसोजा,पोलार्ड फर्नांडिस, अतीत डिसोजा,संतोष तावडे, समीर वंजारी,शशीकांत गोसावी,संतोष कासकर, सत्यवान शेडगे, मीनानाथ वारंग, पवन वनवे, अरबाज मकानदार, हारून मेनन,मांजरेकर इत्यादी उपस्थित होते.