You are currently viewing सावंतवाडीच्या पाणीपुरवठा योजनेचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते १० रोजी  ऑनलाईन पध्दतीने भूमिपूजन 

सावंतवाडीच्या पाणीपुरवठा योजनेचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते १० रोजी  ऑनलाईन पध्दतीने भूमिपूजन 

सावंतवाडीच्या पाणीपुरवठा योजनेचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते १० रोजी  ऑनलाईन पध्दतीने भूमिपूजन

सावंतवाडी

नगरोत्थान योजने अंतर्गत सावंतवाडी शहर पाणीपुरवठा योजना सुधारीत कामाचा भूमीपूजन सोहळा १० फेब्रुवारीला सकाळी १० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने जिमखाना मैदान येथे होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, लोकसभा सदस्य विनायक राऊत, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, वैभव नाईक, नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या योजनेअंतर्गत पाळणेकोंड धरणाची सुधारणा करणे, नवीन जलशुध्दीकरण केंद्र बांधणे, शहरातील झिरंग व गरड भागामध्ये दोन उंच पाण्याच्या टाक्यांची उभारणी करणे, पाळणेकोंड धरण ते नवीन पाण्याच्या टाकीपर्यंत गुरुत्ववाहिनी टाकणे तसेच शहरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्था सुधारणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. तरी सावंतवाडी शहरातील पाणीपुरवठया संबंधी ही एक महत्वाची योजना असून या योजनेच्या भूमीपूजन सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याधिकारी सागर साळुंखे यानी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा