कुडाळ :
सांधेदुखी, लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेहींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर माधवबाग यांच्या तर्फे आयोजित करण्यात आले आहे. शनिवार, रविवार दि 10 व 11 फेब्रुवारी 2024 असे दोन दिवस सकाळी 10 ते 4 या वेळेत शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात सांधेदुखी, लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेह या आजारांवर आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी अंतर्गत ECG रँडम शुगर गरजेनुसार करण्यात येईल. या शिबिराचा लाभ सर्व रुग्णांनी घ्यावा असे आव्हान माधवबागच्या कुडाळ, कणकवली, सावंतवाडी शाखेतर्फे करण्यात आलेले आहे. शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कणकवली 9373183888, कुडाळ 9011328581, सावंतवाडी 7774028185 या क्रमांकावर संपर्क साधावा.