You are currently viewing माजी आमदार परशुराम उपरकर मनसे पक्षातून बाहेर..

माजी आमदार परशुराम उपरकर मनसे पक्षातून बाहेर..

उपरकर यांची पुढची राजकीय भूमिका काय ?; चर्चेला उधाण

 

कणकवली :

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने श्री. परशुराम उपरकर यांचा यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षा सोबत कोणताही संबंध असणार नाही, असे पत्र मनसे नेते आणि कोकण प्रभारी गिरीश सावंत यांनी प्रसिद्धीस दिलेले आहे. गिरीश सावंत यांच्या या पत्रावरून परशुराम उर्फ जीजी उपरकर यांची हकालपट्टी असा घेतला जात आहे. तर सरचिटणीस पदासह व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा मी मनसे नेते राज ठाकरे यांचेकडे दिल्याची परशुराम उपरकर यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे राजीनाम्यानंतर उपरकर पुढची राजकीय भूमिका काय घेणार आहेत हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा