कुडाळ :
प्रिन्सपोर्ट क्लब समादेवी मित्रमंडळ कुडाळ आणि श्री देव कलेश्वर मित्र मंडळ नेरुर आयोजित आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेचा शानदार शुभारंभ कुडाळ तहसीलदार नजीकच्या शासकीय क्रीडा मैदानावर दिमाखात पार पडला. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सुगरण हॉटेलचे मालक नितीन परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या स्पर्धेत सिंधुदुर्गसह मुंबई पुणे गोवा आदी भागातून मोठ्या प्रमाणात संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे हे 33 वे वर्ष आहे. उद्धाटन प्रसंगी प्रिन्स स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष संतोष शिरसाट, प्रसाद अणावकर, प्रदिप माने, सुनील धुरी, भूपतसेन सावंत, सहदेव घाडी, नितीन नेमळेकर, अतूल सामंत, सचिन कांबळी, बाळा बाणावलीकर, बंड्या सावंत, अनिल कुलकर्णी, डॉ संजय आकेरकर, अरुण खानोलकर, सुहास प्रभूखानोलकर, डॉ.अमोघ चुबे, डॉ जी.टी.राणे, दिलीप परब, किरण वारंग, सिद्धेश सावंत, जितेश पटेल, अजित खंडे, प्रशांत मागाडे, जीवन बांदेकर, गिरीश काणेकर, दीपक कुडाळकर, बंड्या जोशी, गणपत दळवी, नीलकंठ वंजारी, रुपेश कुडाळकर, श्रीकृष्ण सामंत, राजाराम परब, संदीप रुद्रे, धर्येशिल परभणीकर, रवी राऊळ, संतोष कविटकर, राजू पाटणकर, राकेश नेमळेकर, डॉ संदीप पाटील, पप्पू म्हाडेश्वर, डॉ प्रकाश आघाव, मंगेश तेंडुलकर, नागेश सावंत, श्याम कोळंबकर, रवींद्र ठाकूर, दुर्वा परब, पदाधिकारी, सभासद, क्रिकेटप्रेमी आदी उपस्थित होते. या स्पर्धा रविवारपर्यंत सलग पाच दिवस होणार आहेत.
विजयी संघाला एक लाख, उपविजेत्यास रुपये पन्नास हजारसह अशी भव्य रकमेची विविध पारितोषिके आहेत. सूत्रसंचलन प्रिन्स स्पोर्ट्सचे खजिनदार नितीन नेमळेकर यांनी केले.
सलामीचा पहिला सामना पत्रकार संघ विरुद्ध दशावतार योद्धा यांच्यात झाला. या सामन्यांमध्ये दशावतार योद्धा हा संघ विजयी झाला. सामनावीर म्हणून दर्पण आचरेकर याची निवड करण्यात आली. दुसरा सामना रवळनाथ पंचायतन कोचरा व लिंगेश्वर मुळदे या दोन संघात यामध्ये होऊन कोचरा संघ विजयी झाला. निखिल गावडे सामनावीराचा मानकरी ठरला. तिसरा सामना दशावतार योद्धा व धाड सकल गोवा यांच्यात होऊन गोवा संघ विजयी झाला. गोवा संघाचा अपाली कलगुंटकर सामनावीर ठरला. उप उपांत्य फेरीचा सामना धाड सकळ गोवा व रवळनाथ कोचरा यांच्यामध्ये होऊन धाड सकळ गोवा संघ विजयी होऊन उपांत्य फेरीत प्रवेश केला. रोहन साळगावकर सामनावीराचा मानकरी ठरला.
स्पर्धेसाठी पंच म्हणून संदीप रुद्रे, दीपक धुरी व आंब्रोज अल्मेडा यांनी काम पाहिले. गुणलेखन निळकंठ वंजारे यांनी केले समालोचक म्हणून जय भोसले, योगेश परब व निखिल भर्तू यांनी काम पाहिले.