You are currently viewing “संत निवृत्तीनाथ”

“संत निवृत्तीनाथ”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांना त्रिवार वंदन!

           *””संत निवृत्तीनाथ””*

 

ब्रह्म आनंदाचा पूर संत निवृत्तीनाथ

निवृत्तीदास सर्वोपकारी आधारवड।।धृ।।

 

विठ्ठल रखुमाई माता-पिता गेले छत्र

चार भावंडांतील जेष्ठ निवृत्तीनाथ

सांभाळती ज्ञाना सोपान मुक्ता भावंड।।1।।

 

बालपणा पासून राहे वृत्ती विरक्त

त्र्यंबकेश्वरी लाभती गुरू गहिनीनाथ

लाभे योग दीक्षा अनुग्रह कृपाप्रसाद।।2।।

 

भागवत सांप्रदायाचे आहे आद्यपीठ

वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक

निवृत्तींचे करती गुणगान सर्व संत।।3।।

 

निवृत्तींनी दिले उत्तर गीता निवृत्ती सार

लिहिले सटीक भगवद्गीता समाधी बोध

चारशे अभंग लिहिले केला हरिपाठ।।4।।

 

गीता सांगे कर्मासह घ्यावे नाम अखंड

सांगती जपा रामकृष्ण टाळावे भेदाभेद

माऊलींचे गुरु दाविती ज्ञान भक्ती पंथ।।5।।

 

श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.

Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा