गिरणी कामगार पेन्शनरांची ९ फेब्रुवारी रोजी कुडाळमध्ये सभा
ओरोस :
मुंबई-गिरणी कामगार व इपीएस पेन्शनरांची सभा शुक्रवार ९ फेब्रुवारी रोजी नाथ पै विद्यालय कुडाळ येथे दुपारी १२ वाजता होणार आहे. पेन्शन चळवळीचे राष्ट्रीय महासचिव अतुल दिघे व कोल्हापूर जिल्ह्याचे गिरणी कामगार नेते शांताराम पाटील सभेला उपस्थित राहणार आहेत. पेन्शन आंदोलन व देशातील पेन्शन चळवळीचे धोरण, पेन्शन वाढीची शक्यता, पेन्शन चळवळीच्या मागण्या याची अभ्यासपूर्ण मांडणी या ठिकाणे होणार आहे. सभेला गिरणी कामगार व पेन्शनर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शांताराम परब यांनी एका परिपत्रकाद्वारे केले आहे.