कणकवली पत्रकार संघ आयोजीत स्पर्धेत समृद्धी पेटकर पैठणीच्या मानकरी..
अश्विनी जाधव द्वितीय तर प्रियांका निमणकर तृतीय..
कणकवली
कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या स्नेहसंमेलनात घेतलेल्या खेळ पैठणीचा होम मिनिस्टर स्पर्धेत कणकवली येथील समृद्धी संजय पेटकर या पैठणीच्या मानकरी ठरल्या.अश्विनी विनोद जाधव द्वितीय तर प्रियांका प्रकाश निमणकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेत पत्रकारांच्या सौभाग्यवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
समृद्धी पेटकर यांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी देण्यात आली. तसेच अश्विनी जाधव व प्रियांका निमणकर यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संतोष वायंगणकर, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित सावंत, जिल्हा पत्रकार संघाचे कार्यकारिणी सदस्य संतोष राऊळ, उपाध्यक्ष दिगंबर वालावलकर, अनिकेत उचले, लक्ष्मीकांत भावे, संजय पेटकर, भगवान लोके, योगेश गोडवे, उमेश बुचडे, तुषार हजारे, उत्तम सावंत, सचिन राणे, रंजिता तहसीलदार, किरण खाजनवाडकर, दर्शन सावंत यांच्यासह तालुका पत्रकार समितीचे सदस्य उपस्थित होते. या स्पर्धेत ऋषिकेश मोरजकर यांनी सूत्रसंचालन करून सर्वांची मने जिंकली.