इन्सुली येथे तरुणाची घरातच गळफास घेवून आत्महत्या…
बांदा
इन्सुली कुडवटेंब येथील संदेश एकनाथ कळंगुटकर (वय ३४) या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. घरात कोणी नसल्याचे पाहून रविवारी दुपारी त्याने आत्महत्या केली. याबाबत बांदा पोलिसांत त्याचा चुलत भाऊ सर्वेश कळंगुटकर याने खबर दिली असून बांदा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील कुडवटेंब येथे कळंगुटकर याचे घर आहे, त्याची आई दुपारी बचत गटाच्या मिटिंग साठी बाहेर गेली होती. ती मिटिंग नंतर घरी परतली आणि संदेशला हाक मारत होती, मात्र घरातून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने तिने शेजारच्याना हाक मारली. त्यावेळी त्यांनी दरवाजा उघडला असता तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्यावेळी याबाबतची माहिती बांदा पोलिसांना दिली त्यानंतर घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला.