शिवाजी महाराजांचा खरा भगवा काय हे लोकसभा निवडणुकीत दाखवून देणार – उद्धव ठाकरे
मालवण
मुख्यमंत्री बनायचे माझे तेव्हाही स्वप्न नव्हते आता मात्र गद्दारांच्या नाकावर टिचून पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखविणार म्हणजे दाखविणारच. भाजपाने लाखो वर्षांची परंपरा असलेला भगव्याला छेद केला आहे, त्याला डाग लावला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेमध्ये शिवाजी महाराजांचा खरा भगवा काय असतो हे आता लाल किल्ल्यावर भगवा फडकवून दाखवून देणार असे असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.
मालवणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुपारी आगमन होताच शहरातील भरड नाक्यावर उपस्थित शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले. उद्धव ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यामागे भव्य मोटारसायकल रॅली ही लक्षवेधी ठरली. यात शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यानंतर बंदर जेटी येथे ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले त्यानंतर ते होडीने किल्ले सिंधुदुर्ग येथे रवाना आहेत किल्ले सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातील सिंहासनाचे लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराजांना भरजरी वस्त्र व जिरेटोप परिधान करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. त्यानंतर बंदर जेटी येथे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.
ते म्हणाले, शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्र लुटण्यासाठी आग्र्याहून आले होते. आता दिल्लीवरून येत आहेत. याच गद्दारांनी महाराष्ट्र लुटण्यासाठी सत्ता पाडण्याचे पाप केले. यावेळी श्री. ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टोले लगावले. महाराष्ट्र लुटणारे शिवाजी महाराजांचा येथे पुतळा उभारून गेले. मात्र कोकणावर जेव्हा संकटे आली तेव्हा पंतप्रधान येथे फिरकले नाहीत. आता येथील मतांवर डोळा ठेवून त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास आठवू लागला आहे.
तुम्ही येथे वैभव नाईक व विनायक राऊत यांना निवडून दिले नसते तर येथे गुंडांचे राज्य दिसले असते जे आता कल्याण मध्ये दिसत आहे. सत्ताधारी पक्षात आता गॅंगवॉर सुरू झाल्याचे दिसून येत असे. शिंदे गॅंग व फडणवीस गॅंग या दोन गॅंग अस्तिवात आल्या आहेत. पोलीस ठाण्यात गोळीबार होतोय पोलीस हतबल झाले आहेत. आमच्या रक्षणासाठी असलेला कायदाच जर हतबल झाला तर असे गणपत गायकवाड तयार झाले तर दोष कोणाला द्यायचा?जोपर्यंत शिंदे मुख्यमंत्री बसले आहेत तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये गुंडांचेच राज्य चालणार आहे असे भाजप आमदार गायकवाड यांनी विधान केले आहे. काल परवा हेमंत सोरेनला अटक झाली. आता ते केजरीवाल यांच्या मागे लागले आहेत. जर यांना अटक होत असेल तर गणपत गायकवाड यांच्या विधानानुसार शिंदेंकडे असणाऱ्या कोट्यावधी रुपयांची चौकशी होणार काय की होणार नाही की क्लीन चीट मिळणार आणि ही मोदी गॅरंटी असेल हे लवकरच कळेल.
ते म्हणाले, मी आता महाराष्ट्रभर फिरणार आहे, महाराष्ट्राला सांगणार आहे, काळजी करू नका जनता एकवटली तर गुंड गाढला जाऊ शकतो हे सिंधुदुर्ग वासियानी दाखवून दिलं आहे. जमिनी ढापण्यासाठी तेव्हा धमक्या दिल्या जात होत्या. शिवसैनिक जेव्हा तुमच्या सोबत राहिला नसता तर सिंधुदुर्ग कोणाच्यातरी खासगी सातबारावर चढला असता. आता खरी आपल्या अस्तित्वाची नाही तर गुंडांच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. इतिहास या सगळ्या गोष्टीची नोंद घेत असतो असेही ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
मालवण बंदरजेटीवरील सभेप्रसंगी उद्धव ठाकरेंनी आमदार वैभव नाईक यांच्या पाठीवर थाप दिली. जर जनता एकवटली तर गुंडागर्दी गाडु शकते हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने मागील काही निवडणूकीत वैभव नाईक व विनायक राऊत यांच्या विजयानंतर दाखवून दिले आहे. त्यामुळे वैभव तुझ्यावर जनतेचा विश्वास आहे तू पुन्हा लढ असा आशीर्वाद ठाकरे यांनी नाईक यांना दिला.
मालवण बंदरजेटी येथील कार्यकर्त्यांशी सवांद साधताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार वैभव नाईक यांचे कौतुक केले. ज्या महाराजांनी स्वराज्य स्थापन केले त्या महाराजांना नवे वैभव प्राप्त झाले असे. महाराजांना साजेसे असे सिहासन आमच्या वैभव नाईक यांनी उपलब्ध करून दिले याबद्दल उद्धव ठाकरेंनी नाईक यांचे उपस्थित शिवसैनिकांसमोर जाहीर कौतुक केले.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार भास्कर जाधव, वरूण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर, माजी महापौर दत्ता दळवी, रुची राऊत, गितेश राऊत, रमेश कोरगावकर, संदेश पारकर, अरुण दुधवडकर, अतुल रावराणे, हरी खोबरेकर, यतीन खोत, बाळा गावडे, सरपंच भगव